आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Congress Constitutes 5 Member Committee News Updates; P Chidambaram, Digvijaya Singh, Jairam Ramesh, Amar Singh And Gaurav Gogoi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारवर कुरघोडी करण्याची तयारी:कॉंग्रेसने 5 सदस्यीय समिती केली स्थापन, ही समिती मोदी सरकारने आणलेल्या अध्यादेशाबाबत ठरवणार पक्षाची भूमिका

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माजी अर्थमंत्री पी चिदंबरम, दिग्विजय सिंह, जयराम रमेश, अमर सिंह आणि गौरव गोगोई या समितीचे सदस्य असतील

कॉंग्रेसने 5 सदस्यीय समिती गठीत केली आहे. ही समिती मोदी सरकारने आणलेल्या अध्यादेशांबाबत पक्षाची भूमिका ठरवेल. या समितीमध्ये माजी अर्थमंत्री पी चिदंबरम, दिग्विजय सिंह, जयराम रमेश, अमर सिंह आणि गौरव गोगोई हे सदस्य असतील. रमेश यांना समितीचे संयोजक केले गेले आहे.

पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्या मते, पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 5 सदस्यीय समिती गठीत केली आहे. ही समिती सरकारने आणलेल्या अध्यादेशांवर पक्षाची भूमिका काय आहे याचा निर्णय घेईल.'

कॉंग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे
कॉंग्रेस कार्यकारी समितीची (सीडब्ल्यूसी) सोमवारी बैठक झाली. ही बैठक सुरू होताच अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 23 ज्येष्ठ नेत्यांकडून नेतृत्वात बदल करण्याच्या पत्राचा हवाला देत पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याचा प्रस्ताव ठेवला. 7 तासाच्या विचारमंथनानंतर, त्यांनी अजुन 6 महिने अंतरिम अध्यक्ष राहण्याचे मान्य केले.

सोनिया गांधींना पत्र लिहिणारे नेते भाजपसोबत मिळालेले असल्याच्याही चर्चा झाल्या. हा आरोप राहुल गांधींनी केल्याचे वृत्त होते. राहुल यांनी पत्र पाठवण्याच्या टायमिंगवरही प्रश्न उपस्थित केले. या पत्रावर सही करणाऱ्या गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधींचे आरोप खरे ठरल्यास संन्यास घेणार असल्याचे म्हटले. तर कपिल सिब्बलही यांनीही कठोर शब्दात ट्विट करत यावर नाराजी दर्शवली. मात्र नंतर त्यांनी आपले ट्विट मागे घेतले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser