आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress Constitution To Remove Oath Not To Drink Alcohol, Agreement To Set Up Committee After Long Deliberations

बदल:काँग्रेसच्या संविधानातून मद्यपान न करण्याची शपथ वगळणार, दीर्घ मंथनानंतर समितीची स्थापना करण्यावर सहमती

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसमध्ये परिवर्तनाला सुरुवात झाली आहे. पक्षाच्या सदस्यत्व अभियानाला साेमवारपासून सुरुवात झाली आहे. परंतु पक्षातील खरा बदल संविधानात हाेणार आहे. कारण १०० वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांच्या पक्षाच्या अध्यक्षतेखाली हे संविधान लिहिण्यात आले हाेते. नव्या संविधानात मद्यपान करणे आणि खादी विणण्याच्या अनिवार्यतेच्या नियमांत सवलत दिली जाऊ शकते. सार्वजनिक व्यासपीठावर विधाने करू नयेत यासाठीचे नियम कडक केले जाणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

केंद्रातील सत्तेपासून दूर राहिलेल्या काँग्रेसमध्ये मंथनाला सुरुवात झाली आहे. म्हणूनच पक्षाच्या घटनेत परिवर्तन गरजेचे आहे यासाठी पक्षांतर्गत दबाव वाढला आहे. राज्याच्या निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्यासाठी आॅक्टाेबरमध्ये पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या एका बैठकीत या मुद्द्यावर मनमाेकळी चर्चा झाली आणि त्यावर सैद्धांतिक सहमतीदेखील तयार झाली आहे. काळानुसार जुन्या झालेल्या नियमांत बदल हाेणे आणि काही नियमांना कडक करण्याची वेळ आली आहे.

राहुल गांधी म्हणाले, बैठकीत उपस्थित किती लाेकांना खादी विणणे जमते? काँग्रेस पक्षाचा सदस्य हाेण्यासाठी १८ वर्षांची अट अनिवार्य असावी. तुम्हाला प्रामाणिकपणे खादी विणता यायला हवी ही दुसरी अट आहे. मद्यपानापासून दूर राहावे या गाेष्टींचे पालन करू शकलाे नसल्याचे बैठकीत उपस्थित ६० टक्के लाेकांनी मान्य केले.

दीर्घ मंथनानंतर पक्षाच्या संविधानात बदल करण्यासाठी समितीची स्थापना करण्यावर सहमती झाली. त्यानुसार नियमांत काळानुरूप बदल केले जातील.

बातम्या आणखी आहेत...