आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress Criticized Union Budget 2023 | Pm Narendra Modi | Nirmala Sitharaman | Jayram Ramesh

'आश्वासने जास्त, काम कमी':काँग्रेसची अर्थसंकल्पावर टीका; म्हटले- ही मोदींची 'हेडलाइन मॅनेजमेंट'ची 'ओपेड' रणनीती

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर तिखट शब्दांत टीका केली आहे. नरेंद्र मोदी सरकारने गतवर्षीच्या अर्थसंकल्पावरही कौतुकाचा वर्षाव केला होता. पण नंतर हे बजेट आश्वासने जास्त व काम कमी या धोरणावर अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले. यंदाचे बजेटही याच धाटणीचे आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

मोदींची हेडलाइन मॅनेजमेंट

काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश बुधवारी एका ट्विटद्वारे म्हणाले - गतवर्षीच्या अर्थसंकल्पातील कृषी, आरोग्य, शिक्षण, मनरेगा व अनुसूचित जातींच्या कल्याणासंबंधीच्या तरतुदींची प्रशंसा झाली. पण आज वास्तव सर्वश्रूत आहे. प्रत्यक्ष खर्च बजेटच्या तुलनेत फार कमी आहे.

हे काम कमी आश्वासने जास्त या मोदींच्या हेडलाइन मॅनेजमेंटच्या ओपेड रणनीतीचा भाग आहे, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

भांडवली खर्चात वाढ

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सोईसुविधांच्या विकासावर भांडवली खर्चात 33 टक्क्यांची वाढ करून तो 10 लाख कोटी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे जीडीपीच्या तुलनेत 3.3 टक्के आहे.

सीतारामन आपल्या भाषणात म्हणाल्या की, नुकत्याच स्थापन केलेल्या पायाभूत सुविधा वित्त सचिवालयाच्या मदतीने अधिक खाजगी गुंतवणूक आकर्षित करता येईल. सीतारामन यांनी 7 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यामुळे या श्रेणीतील करदात्यांना कोणताही कर लागणार नाही. दुसरीकडे, प्राप्तिकर स्लॅबची संख्याही 7 वरून 5 करण्यात आली आहे. सीतारामन यांनी महिला बचत सन्मान योजना सुरू करण्याचीही घोषणा केली आहे.

बातम्या आणखी आहेत...