आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress Freedom March In New Delhi Headquarters । Priyanka Gandhi Rahul Gandhi Latest News

पोलिसांच्या परवानगीशिवाय काँग्रेसचा मोर्चा:प्रियंका म्हणाल्या- आज राजकारणावर बोलणार नाही; गांधींच्या स्मृतिस्थळी राहुल नतमस्तक

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेस पक्षाने महागाई- भ्रष्टाचाराविरोधात मोर्चा काढला आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह पक्षाचे नेते घोषणाबाजी करत काँग्रेस मुख्यालयातून बाहेर पडले. महात्मा गांधींच्या हौतात्म्य पत्करलेल्या 30 जानेवारी मार्गाने हा मोर्चा काँग्रेस मुख्यालयात पोहोचला. तिथे राहुल गांधींसह सर्व काँग्रेस नेत्यांनी बापूंना श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजलीनंतर मोर्चाची सांगता झाली.

काँग्रेस पक्षाने हा मोर्चा काढण्यासाठी पोलिसांची परवानगी मागितली होती, मात्र पोलिसांनी त्यांना मोर्चा काढू दिला नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांनी परवानगी न घेता मोर्चा काढला.

पदयात्रेत प्रियंका गांधी हातात तिरंगा घेऊन चालत होत्या. G23 नेते गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा हेदेखील पदयात्रेत उपस्थित होते. बऱ्याच दिवसांनी गुलाम नबी राहुल यांच्यासोबत दिसले आहेत. प्रियंका गांधींनी घराणेशाहीवर पंतप्रधान मोदींच्या भाषणावर भाष्य करण्यास नकार दिला. त्या म्हणाल्या- आज स्वातंत्र्याचा वर्धापन दिन आहे. आज आम्ही राजकारणावर बोलणार नाही. आज फक्त देशाचा प्रश्न असेल.

30 जानेवारी मार्गावर महात्मा गांधी यांच्या हौतात्म्य स्थळावर श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर हे संकल्प घेण्यात आले.
30 जानेवारी मार्गावर महात्मा गांधी यांच्या हौतात्म्य स्थळावर श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर हे संकल्प घेण्यात आले.

काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला संकल्प

महात्मा गांधींना त्यांच्या हौतात्म्यस्थळी आदरांजली वाहल्यानंतर तेथे जमलेल्या सर्व काँग्रेसजनांनी देशाच्या अखंडतेसाठी आणि विकासासाठी काम करण्याची शपथ घेतली. यासोबतच काँग्रेसच्या धोरणांचे पालन करण्याची आणि द्वेष, जाती-धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन होऊ न देण्याची शपथ देण्यात आली.

अंबिका सोनी यांनी काँग्रेस मुख्यालयात तिरंगा फडकवला

काँग्रेस मुख्यालयात झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात माजी मंत्री अंबिका सोनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला राहुल गांधीही उपस्थित होते आणि ते कार्यकर्त्यांमध्ये उभे राहिले. ध्वजारोहणापूर्वी वंदे मातरम नंतर ध्वजगीत आणि राष्ट्रगीत झाले.

काँग्रेस मुख्यालयात माजी मंत्री अंबिका सोनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
काँग्रेस मुख्यालयात माजी मंत्री अंबिका सोनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहणाच्या वेळी राहुल गांधी कार्यकर्त्यांसोबत उभे राहिले. त्यांच्यासोबत गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा होते.
काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहणाच्या वेळी राहुल गांधी कार्यकर्त्यांसोबत उभे राहिले. त्यांच्यासोबत गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा होते.

सोनियांचा देशाला संदेश

तत्पूर्वी, सोनिया गांधी यांनी देशवासीयांना उद्देशून पत्र लिहिले. यामध्ये स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना त्यांनी केंद्र सरकारला घेरले आहे. सोनियांनी लिहिले - गांधी-नेहरू-पटेल-आझाद यांसारख्या महान राष्ट्रीय नेत्यांना असत्याच्या आधारे वादात उभे करण्याच्या प्रत्येक प्रयत्नाला काँग्रेस कडाडून विरोध करेल. देशाच्या गौरवशाली कामगिरीला तुच्छ ठरवण्याच्या कामी केंद्र सरकार गुंतले आहे.

मोदींनी लाल किल्ल्यावरील भाषणात म्हटले- घराणेशाही संपवायला हवी. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर मोदी म्हणाले, 'आज आपल्यासमोर दोन मोठी आव्हाने आहेत. भ्रष्टाचार आणि 'घराणेशाही'. आपल्या संस्थांची ताकद ओळखण्यासाठी, गुणवत्तेच्या जोरावर देशाला पुढे नेण्यासाठी आपल्याला 'परिवारवाद' विरोधात जागृती करावी लागेल. भ्रष्टाचार देशाला पोखरत आहे, त्याच्याशी लढायचे आहे. ज्यांनी देशाची लूट केली त्यांना परत यावे लागेल, असे ते म्हणाले. बँक लुटणाऱ्यांची मालमत्ता जप्त केली जात आहे."

बातम्या आणखी आहेत...