आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत-चीन सीमावाद:काँग्रेसने भारताचा ४३ किमीचा भूभाग चीनला सोपवला होता : नड्डा

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माजी पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सल्ला
  • चीन-पाकिस्तानमधील आर्थिक कॉरिडॉर प्रकल्प मोठी आर्थिक चूक सिद्ध होईल : तज्ज्ञ

भारत-चीन सीमेवरील वादावर भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी सोमवारी काँग्रेसवर निशाणा साधला. ते ट्विट करत म्हणाले की, काँग्रेसने सैन्याचा अपमान करणे बंद करावे. राष्ट्रीय एकतेचा योग्य अर्थ समजून घ्यावा. काँग्रेसने सर्जिकल व एअर स्ट्राइकच्या वेळीही असेच केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर १३० कोटी भारतीयांचा विश्वास असल्याचे सांगत नड्डा म्हणाले, २०१० पासून ते २०१३ दरम्यान एलएसीवर ६०० वेळा घुसखोरी झाली. काँग्रेसने ४३ किलोमीटरचा भारताचा भूभाग चीनला सोपवला होता. तेव्हा मनमोहन सिंग हेच पंतप्रधान होते. यूपीएच्या कार्यकाळात युद्ध न करताच सरेंडर करण्यात आले होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे विधान केवळ शब्दांचा खेळ आहे. काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याच्या विधानावर एकाही भारतीयाला विश्वास नाही. आपल्या सशस्त्र दलांचे मनोबल खालावणारी ही तीच काँग्रेस आहे. मोदींनी नेहमी सर्वात आधी देशाला प्राधान्य दिल्याने जनतेच्या त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.

हे होते मोदींचे विधान
पंतप्रधान मोदी भारत-चीन संघर्षावर शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत म्हणाले होते की, आपल्या क्षेत्रात कुणाही घुसखोरी केली नसून चौकीवर ताबा मिळवलेला नाही. दुसरीकडे या विधानाचा विपर्यास केल्याचे पीएमओने सांगितले.

चीन-पाकिस्तानमधील आर्थिक कॉरिडॉर प्रकल्प मोठी आर्थिक चूक सिद्ध होईल : तज्ज्ञ

तेल अवीव |चीनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चीन-पाकिस्तानमधील आर्थिक कॉरिडॉरचे (सीपीईसी) कोट्यवधींचे नुकसान होऊ शकते. तज्ज्ञांनुसार, पाकिस्तानमार्गे कॉरिडॉरच्या निर्मितीसाठी सुरुवातीला ४६ बिलियन डॉलर खर्च होणार होता. मात्र हा खर्च वाढून ८७ बिलियन डॉलर झाला आहे. सीपीईसी रस्ते, रेल्वे आणि ऊर्जा योजनांचे नियोजित नेटवर्क चीनमधील शिनजियांग प्रांतामधील पाकिस्तानमधील ग्वादर बंदराशी जोडण्यासाठी बनवले जात आहे. प्रकल्पाचे एक चतुर्थांश काम पूर्ण झाले आहे. कॉरिडॉरचे कर्जा ८० बिलियन डॉलर आहे. यातील ९० टक्के खर्च पाकला करावा लागेल. मात्र सध्या चीनला ही रक्कम परत करण्याच्या स्थितीत पाकिस्तान नाही.

माजी पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सल्ला
लडाख सीमेवर चीन आणि भारतात सुरू असलेल्या तणावावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, गलवान खोऱ्यात देशाचे २० जवान शहीद झाले. हे बलिदान व्यर्थ जायला नको. आपण इतिहासाच्या नाजूक वळणावर उभे आहोत. भ‌‌विष्यातील पिढ्यांनी आपले आकलन कसे करावे हे सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे. देशाचे नेतृत्व करणाऱ्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. आपल्या लोकशाहीत ही जबाबदारी पंतप्रधानांची आहे. पंतप्रधानांनी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने बोलायला हवे. चीनने एप्रिल २०२० पासून आजपर्यंत भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात आणि पांगोंग त्सो झील परिसरात अनेकदा घुसखोरी केली आहे. आपण चीनच्या धमक्या आणि दबावाला न जुमानता आपल्या भौगोलिक अखंडतेशी तडजोड करू नये. पंतप्रधानांनी आपल्या विधानामधून चीनच्या कटाला बळ देऊ नये. स्थिती आणखी गंभीर न होऊ देण्यासाठी पंतप्रधानांनी परस्पर सहमतीने काम करणे गरजेचे आहे.

हा सल्ला ऐकावा : राहुल
काँग्रेस खासदार राहुल गांधी ट्विट करत म्हणाले, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. भारताच्या भल्यासाठी पंतप्रधान त्यांचा सल्ला विनम्रतेने स्वीकारतील अशी आशा आहे.

बातम्या आणखी आहेत...