आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress Has Not Given Reservation To OBCs For 40 Years, Says Bhupendra Yadav In Lok Sabha

नवी दिल्ली:काँग्रेसने 40 वर्षे ओबीसीं नाआरक्षण हक्क दिला नाही, लोकसभेत विधेयकावरील चर्चेत भूपेंद्र यादव

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभेत मंगळवारी ओबीसीसंंबंधी १२७ व्या दुरुस्ती विधेयकावर चर्चा झाली. यादरम्यान लोकसभेत नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले, काँग्रेस पार्टी या विधेयकाचे खुल्या मनाने स्वागत व समर्थन करते. त्यावर भाजपचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसने ४० वर्षांत मागास वर्गाला आरक्षणाचा हक्क दिला नाही, असे यादव यांनी म्हटले.

हे विधेयक सोमवारी सभागृहात मांडण्यात आले होते. त्यानुसार राज्य व केंद्रशासित प्रदेश सरकार सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या अतिमागास वर्गाची (एसईबीसी) यादी तयार करू शकेल. राज्यांचा हा अधिकार सुप्रीम कोर्टाच्या मराठा आरक्षणाच्या प्रकरणात दिलेल्या निर्णयामुळे संपुष्टात आला होता. लोकसभेतील चर्चेत जनता दल संयुक्तचे ललन सिंह यांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी केली. समाजवादीचे अखिलेश यादव, बसपाचे ऋतेश पांडेय, द्रमुकचे टी.आर. बालू यांनी त्याचे समर्थन केले. राज्यसभेत विरोधकांनी नवे तीन कृषी कायदे व शेतकरी आंदोलनावर चर्चेची मागणी करून गदारोळ केला. विरोधकांची घोषणाबाजी सुरू असतानाच आम आदमी पार्टीचे सदस्य टेबलवर उभे राहून घोषणा देत होते. नियमावलीच्या पुस्तिकेला फेकण्यात आले. सभापतींनी कामकाज सुरळीत चालावे यासाठी प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. परंतु काही निष्पन्न झाले नाही.

नागरी सहकारी बँकांत भ्रष्टाचार कमी : अर्थमंत्री
नागरी सहकारी बँकांत भ्रष्टाचाराची प्रकरण कमी आहे. २०१९-२०२० मध्ये भ्रष्टाचाराचे ५६८ प्रकरणे समोर आली होती. २०२१मध्ये अशी ३२३ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. राज्य सहकारी बँकेत भ्रष्टाचाराचे ५०८ प्रकरणे आढळून आले. २०२०-२१ मध्ये ४८२ गुन्हे दाखल करण्यात आली, अशी माहिती केंद्रिय अर्थमंत्र्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...