आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत राहणारे काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी सर्व मर्यादांचे उल्लंघन करत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर अश्लाघ्य टिप्पणी केली. त्यांनी राष्ट्रपतींना ‘राष्ट्रपत्नी’ असे संबोधले. काँग्रेसला रस्त्यांवरून संसदेपर्यंत घेरण्यात आले. भाजपने गुरुवारी संसदेत हा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींकडे माफीची मागणी केली. लोकसभेत सोनिया आणि स्मृती इराणी यांच्यात चकमक उडाल्यानंतर वाद आणखी वाढला. आता भाजप हक्कभंग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे. त्याअंतर्गत सोनियांनी माफी मागितली नाही तर त्यांच्याविरोधात कारवाई सुरू होऊ शकते.
गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, सोनिया गांधींनी जो शाब्दिक वाद घातला त्यासाठी त्यांना माफी मागावी लागेल. सोनियांनी धमकी दिल्याचा काँग्रेसचा आरोप; त्या जखमी होण्याची शक्यता होती : काँग्रेसची टिप्पणी : सोनिया गांधी भाजप सदस्यांशी ‘धमकी’ च्या सूरात बोलत होत्या, असा आरोप अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केला. स्वत:च्या वर्तणुकीसाठी त्यांनी माफी मागायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली. दुसरीकडे, लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई म्हणाले,‘चौधरींनी माफी मागितली आहे. सोनिया गांधींना जी वागणूक देण्यात आली, ती योग्य नाही. त्यांना जखम होऊ शकली असती.’ तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मित्रा म्हणाल्या,‘ज्या वेळी हा घटनाक्रम घडला तेव्हा मी लोकसभेतच होते. एका ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेला घेरून त्यांनी त्यांच्यावर दबाव आणला. नियम फक्त विरोधी पक्षासाठीच आहेत का?’
- राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी अधीर रंजन चौधरी यांना नोटीस पाठवून ३ ऑगस्टला आयोगासमोर हजर राहण्याचा आदेश दिला आहे.
संसदेत स्मृती इराणी म्हणाल्या, मी तुमचे नाव घेतले... सोनिया - माझ्याशी बोलू नका
लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजता तहकूब झाले. त्यानंतर सोनिया भाजप खासदार रमादेवी यांच्यापाशी गेल्या. त्या वेळी स्मृती इराणीही तिथे गेल्या. त्या अधीर यांच्या वक्तव्याचा निषेध करीत होत्या. सोनिया खासदार रमा यांच्याशी बोलत असतानाच स्मृती सोनियांना उद्देशून म्हणाल्या, तुमचे नाव मी घेतले होते. काही मदत करू का ? प्रथम सोनियांनी त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर तुम्ही माझ्याशी बोलू नका, असे सोनिया म्हणाल्या. त्यावरून दोघींमध्ये वाद सुरू झाला.त्याच वेळी सुप्रिया सुळे तिथे गेल्या आणि त्या सोनियांना घेऊन निघून गेल्या. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रमादेवींनी सांगितले की, या वादात मला का ओढले जातेय ? माझी काय चूक आहे असे सोनिया मला विचारत होत्या. तत्पूर्वी स्मृती म्हणाल्या, द्रौपदी मुर्मू यांचे नाव जाहीर झाल्यापासून काँग्रेसने त्यांच्यावर टीका सुरू केली आहे.
माझी चूक झाली, मी राष्ट्रपतींची माफी मागेन : अधीर
‘एक शब्द चुकून निघाला. बंगाली आहे, हिंदी चांगली नाही. चूक मान्य करतो. राष्ट्रपतींना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे,त्यांची माफी मागेन. मात्र, या ढोंगी लोकांची नाही. मला फासावर लटकवायचे असेल तर लटकवा.’ - अधीर रंजन चौधरी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.