आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसमध्ये कलह:नेते अधीर रंजन यांची आनंद शर्मांवर टीका; म्हणाले, शर्मांचा ‘भविष्यातील बॉस’ला खुश करण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली/गुवाहाटी/जम्मू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्व सहकाऱ्यांसोबत 100% सहमत होणे शक्य नाही : प्रियंका गांधी वाड्रा

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांतील कलह आता उघडपणे समोर येऊ लागला आहे. आता पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरींनी आपल्याच पक्षाच्या वरिष्ठ राज्यसभा खासदार आनंद शर्मांवर नेम साधला आहे. ते म्हणाले, “शर्मा आपल्या ‘भविष्यातील बॉस’ला खुश करण्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळे ते काँग्रेसची प्रतिमा बिघडवण्याचा खटाटोप करत आहेत.’

चौधरी एका मुलाखतीत मंगळवारी आनंद शर्मांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत होते. शर्मांनी काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि इंडियन सेक्युलर फ्रंटच्या (आयएसएफ) आघाडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ते म्हणाले होते, ‘आयएसएफशी आघाडी काँग्रेसच्या गांधीवादी आणि नेहरूवादी विचारधारेविरुद्ध आहे.’ बंगालमध्ये मुस्लिमांचे धर्मस्थळ दरगाह फुरफुरा शरीफच्या प्रमुखांनी आयएसएफची स्थापना केलेली आहे. हा पक्ष काँग्रेस व डाव्या आघाडीसोबत विधानसभा निवडणुकीत उतरला आहे. अधीर रंजन सोशल मीडियावर म्हणाले, “बंगालमध्ये डाव्या पक्षांसोबतच्या आघाडीत काँग्रेस एक भागीदार आहे. आमचाही उद्देश भाजपच्या जातीयवादी धोरणाविरुद्ध लढणे हा आहे.’ ते मुलाखतीत म्हणाले होते, ‘शर्मांकडे काँग्रेसविरुद्ध बोलण्यासाठी योग्य कारण नाही. त्यांना आक्षेप असता तरे ते थेट मला बोलू शकले असते.’

जम्मूत आझाद यांचा पुतळा जाळला : दुसरीकडे, जम्मूत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा पुतळा जाळला. ते म्हणाले, “आझाद राज्यातील डीडीसी (जिल्हा विकास परिषद) निवडणुकीत प्रचारासाठी आले नाहीत. आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा करण्यात वेळ वाया घालवत आहेत.’ दरम्यान, सूत्रांनुसार आझाद यांनी म्हटले आहे,आपण मोदींची स्तुती केलेली नाही. आपल्या वक्तव्यांचा विपर्यास करण्यात आला आहे.’

सर्व सहकाऱ्यांसोबत १००% सहमत होणे शक्य नाही : प्रियंका गांधी वाड्रा
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा प्रचारासाठी मंगळवारी आसामात होत्या. त्यांनी बंगालमध्ये आयएसएफ आणि आसामात एआययूडीएफसोबत आघाडीच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्या म्हणाल्या, “आघाडीतील सर्व सहकारी एकमेकांच्या विचारधारांशी १००% सहमत असतील, असे शक्य नसते. मात्र आम्ही जातीयवादाविरोधात एकत्रितरीत्या लढत आहोत.’

बातम्या आणखी आहेत...