आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Congress Leader Ahmed Patel Pass Away, Breathed His Last At 3.30 Am At Medanta Hospital In Gurugram, Corona Was Infected On 1 October

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निधन:काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन, 1 ऑक्टोबरला झाली होती कोरोनाची लागण

गुरुग्राम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अहमद यांचे चिरंजीव फैजल यांनी ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली

काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि गुजरात राज्यसभा खासदरा अहमद पटे यांचे आज पहाटे निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. पटेल यांना 1 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना 15 ऑक्टोबर रोजी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल केले होते. पटेल यांनी कोरोना झाल्याची माहिती देताना सर्व निकटवर्तीय आणि संपर्कात आलेल्या लोकांना स्वतःला क्वारंटाइन करण्याचे आणि कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन केले होते.

अहमद पटेल यांचे सुपु्त्र फैजल यांनी ट्विट केले की, "मला मोठ्या दुःखाने सांगायचे आहे की, माझे वडील अहमद पटेल यांचे बुधवारी पहाटे 3.30 वाजता निधन झाले. सुमारे एक महिन्यापूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आणि त्यांच्या शरीरातील अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते. यांनतर त्यांचे निधन झाले. अल्लाहने त्यांना जन्नत द्यावी." फैझलने आपल्या सर्व हितचिंतकांना कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे व सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन केले.

पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमद पटेल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले की, "अहमद पटेल यांच्या निधनाने दुःखी आहे. त्यांनी अनेक वर्षे सार्वजनिक जीवनात समाजासाठी काम केले. त्यांना त्यांच्या कुशाग्र बुद्धीसाठी ओळखले जायचे. काँग्रेसला बळकटी दिल्याबद्दल ते नेहमीच आठवणीत राहतील. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."

राहुल गांधी म्हणाले, "आज दुःख दिवस आहे. अहमद पटेल काँग्रेसचा स्तंभ होते. ते नेहमीच पक्षासाठी जगले आणि कठीण प्रसंगी पक्षासोबत उभे राहिले. आम्हाला नेहमीच त्यांची आठवण येईल."

सोनिया यांचा शोक संदेश

"मी असा सहकारी गमावला, ज्याने आपले संपूर्ण आयुष्य काँग्रेसला समर्पित केले होते. त्यांची विश्वासार्हता, काम करण्याचे समर्पण, इतरांना मदत करणे यासारखे गुण त्यांना इतरांपेक्षा वेगळे करत होते. त्यांच्यामुळे झालेली पोकळी कधीच भरून निघू शकत नाही. त्यांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना आहेत."

28 व्या वर्षी खासदार झाले होते

अहमद पटेल यांचा जन्म 21 ऑगस्ट 1949 रोजी गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील पिरामण गावी झाला होता. ते 3 वेळेस लोकसभा खासदार (1977 ते 1989) आणि 4 वेळा राज्यसभेचे खासदार (1993 ते 2003) राहिले. त्यांनी 1977 मध्ये भरूच लोकसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढवली होती आणि 62 हजार मतांनी विजयी झाले होते. तेव्हा ते केवळ 28 वर्षांचे होते. 1980 मध्ये पटेल भरूच येथूनच 82 हजार 844 आणि 1984 मध्ये 1 लाख 23 हजार 69 मतांनी विजयी झाले होते.

पटेल सोनिया यांचे राजकीय सल्लागार होते

पटेल यांनी जानेवारी ते सप्टेंबर 1985 पर्यंत तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे संसदीय सचिव म्हणून काम पाहिले. 2001 पासून सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार होते. जानेवारी 1986 मध्ये ते गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष झाले. ते 1977 ते 1982 पर्यंत युवा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. सप्टेंबर 1983 ते डिसेंबर 1984 पर्यंत ते काँग्रेसचे सहसचिव होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser