आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress Leader AK Antony Retiring From Politics | Marathi News |Information That Senior Congress Leader AK Antony Has Written A Letter To Sonia Gandhi Retiring From Politics

अँटनींचा राजकारणातून संन्यास:काँग्रेसचे वरिष्ठ नेते एके अँटनी यांचा राजकारणातून संन्यास, सोनिया गांधी यांना पत्र लिहून दिली माहिती

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एके अँटनी यांना राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. राजकारणातून संन्यास घेतल्यानंतर आपण कोणतीही निवडणूक लढवणार नाही. असा निर्णय देखील अँटनी यांनी घेतला आहे. त्यासंबधी अँटनी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना एक पत्र लिहले आहे. त्यात त्यांनी आपण राजकारणात संन्यास घेत असल्याचे म्हटले आहे.

पुढच्या महिन्यात संपत आहे राज्यसभेचा कार्यकाळ
एके अँटनी हे केरळहून राज्यसभेचे खासदार आहेत. येत्या 2 एप्रिल रोजी त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपणार आहे. 1970 मध्ये अँटनी पहिल्यांदा केरळमध्ये आमदार झाले होते. तेव्हापासून ते राजकारणात सक्रिय आहेत.

सोनिया गांधी यांना लिहले पत्र

गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान एके अँटनी म्हणाले होते की, आपण लवकरच राजकारणातून संन्यास घेणार आहोत. अँटनी यांचे वय 81 असून, गेल्या 51 वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय आहेत. मात्र, त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपण काही महिन्यांपूर्वीच सोनिया गांधी यांना एक पत्र लिहले असून, राजकारणातून संन्यास घेत आहोत. अशी माहिती दिली आहे. असे अँटनी म्हणाले.

दिल्लीत नाही राहणार अँटनी

राजकारणातून संन्यास घेतल्यानंतर आपण दिल्ली न राहण्याचा निर्णय अँटनी यांनी घेतला आहे. सेवा समाप्तीनंतर आपण तिरुवनंतपुरम येथे जाणार आहे. पुढे अँटनी म्हणाले की, "मला पक्षाने अनेकदा संधी दिल्या. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. मी आता राजकारणातून संन्यास घेत असून, लवकरच दिल्ली सोडून तिरुवनंतपुरम येथे जाणार आहेत." असे अँटनी म्हणाले.

तीनदा केंद्रीय मंत्री होते अँटनी
एके अँटनी हे 10 वर्ष काँग्रेस संसदीय समितीचे प्रेसिटेंड होते. ते पाच वेळा राज्यसभेचे खासदार आणि विधानसभेचे आमदार राहिले आहेत. यासोबतच ते तीनदा केंद्रीय मंत्री होते. अँटनी हे वयाच्या 37 व्या केरळचे मुख्यमंत्री झाले होते. आतापर्यंत ते तीनदा मुख्यमंत्री राहिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...