आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इंटरव्ह्यू:राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत ही काँग्रेस संघटनेची इच्छा, मी त्यांना म्हणालो- पक्षाची दिशा तुमच्या नेतृत्वात निश्चित व्हावी, ते म्हणतात-मी विचार करतोय

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वीलेखक: मुकेश कौशिक
  • कॉपी लिंक
  • राज्यसभेत काँग्रेसचा आवाज समजले जाणारे जयराम रमेश यांच्याशी संघटन, नेतृत्व आणि बंडखोरांबाबत चर्चा

काँग्रेसमध्ये खुल्या विचारमंथनाचा काळ सुरू आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते स्पष्ट भूमिका घेत असून पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी आग्रह धरत आहेत. राज्यसभेत काँग्रेसचा आवाज मानले जाणारे जयराम रमेश यांनी दै. भास्करशी विशेष चर्चत रोखठोक मते मांडली. महाकाव्य “लाइट ऑफ एशिया’वर अलीकडे प्रकाशित पुस्तकावरून चर्चेत आलेल्या जयराम रमेश यांनी सोनिया गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसची अंतर्गत स्थिती, पक्षाचे नेतृत्व सांभाळण्यात राहुल गांधींची स्वीकारार्हता आणि संघटनेच्या कच्च्या बाजूबाबत त्यांनी मोकळेपणाने मतप्रदर्शन केले. या चर्चेतील काही अंश... काँग्रेस जरा जास्तच लोकशाहीवादी पक्ष आहे... शिस्त आवश्यक आहे असे वाटते

पक्षात जी-23 चे मत आहे...
हा प्रसारमाध्यमाचा शोध आहे. पक्ष लोकशाहीवादी आहे. आम्ही एकमेकांवर टीका करतो, खेचतो. कधी कधी वाटते की, पक्षात शिस्त आवश्यक आहे. काँग्रेसमध्ये एखादी बैठक असेल तर १० मिनिटांत पूर्ण मीडियाला माहीत हाेते. भाजप, सीपीएमच्या बैठकीचा पत्ता लागत नाही. ज्योतिरादित्य आणि जितीनसारखे लोक संधिसाधू आहेत, स्वत:चा फायदा पाहतात

जितिन, ज्योतिरादित्य पक्षाबाहेर गेल्याने नुकसान झाले?
एक जितीन प्रसाद, एक सिंधिया गेल्यावर हजार तरुण ज्यांच्याकडे मोठ्या कुटुंबाचे नाव नाही, ते काँग्रेसमध्ये येतील. सिंधिया, जितीन यांना काय दिले नाही? जितीनना प्रभारी केले. सिंधियांना पीसीसी अध्यक्षाची ऑफर मिळाली होती. हे लोक संधिसाधू आहेत. ते स्वत:चा फायदा पाहतात.

खुर्चीला चिकटून राहणे आणि व्यक्तीपूजा... या दोन अवगुणांना काँग्रेस बळी पडली आहे काय?
देशात सर्व काँग्रेसतज्ज्ञ आहे. काँग्रेसवर निशाणा साधणे एक राष्ट्रीय खेळ झाला आहे. सत्तेला चिकटणे सर्व पक्षांना आवडते. काँग्रेस एनजीओ नाही, सत्तेसाठी लढते. भक्तीचे विचाराल तर बाबासाहेब आंबेडकरांनी दशकांआधी सांगितले होते, एक दिवस आपण सर्व भक्तियोगी होऊ, कर्मयोगी राहणार नाहीत. काँग्रेसकडून चुका झाल्या. कमजोरीही आहे.

२०१४ आणि २०१९ च्या पराभवाचा आढावा घेतला?
हा चिंतेचा विषय आहे. आधीही अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात आम्ही ६ वर्षे सत्तेत होतो. मात्र, अटलबिहारी वाजपेयी यांचा भाजप आणि नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या भाजपत जमीन-अस्मानाचा फरक आहे. मोदी-शहाचा भाजप खूप क्रूर आहे. आता प्राप्तिकर असो, अंमलबजावणी संचालनालय असो, सीबीआय असो... त्यात त्यांना विधिनिषेध नाही. वाजपेयी-अडवाणी नेहरूवादी जगात वाढले होते.

पक्ष दोन वर्षांपासून अध्यक्षाबाबत निर्णय का घेऊ शकला नाही?
अध्यक्ष तर सोनियाजी आहेत. मात्र, त्या अंतरिम अध्यक्ष आहेत. सर्व पातळीवर आपणाला नेतृत्व बळकट करण्याची गरज आहे. असे नेतृत्व, जे लोकांत विश्वास निर्माण करेल.

राहुल गांधी बिगर गांधी अध्यक्षाच्या प्रस्तावावर सहमत आहेत?
राहुलजींनी परत यावे असे संघटनेला वाटते.सर्वांशी बोलल्यास राहुल यांनी नेतृत्व करावे असे ते म्हणतील.

मग संकोच का?
मी याबाबत काय सांगू? मी राहुलजींना सांगितले की, तुम्ही परत यावे असे पक्षात सर्वांना वाटते. त्यांनी सांगितले की, मी विचार करत अाहे.

काँग्रेस भाजपसारखा आक्रमक विरोधी पक्ष का होऊ शकला नाही?
हे खरे आहे. विरोधात राहायचे आम्हाला शिकायचे आहे. आजही आम्ही मंत्री असल्यासारखे वागतो. जे काँग्रेसी मंत्री होते ते अजूनही त्यातून बाहेर आलेले नाहीत. ते नेहमी सांगतात की, माझ्या काळात तर असे होत होते. अरे मित्रा, तुझा काळ ७ वर्षांपूर्वीच गेला. युवक काँग्रेसने नुकतेच कोरोनाकाळात जे केले तशाच भूमिकेची गरज आहे.

विरोधकाची भूमिका शिकण्यास आणखी किती वेळ लागेल?
निवडणुकीच्या राजकारणात याचा अंदाज घेणे अवघड आहे. कधी कधी विरोधकांची सर्जनशील भूमिकाही असते. लसीकरण असाच मुद्दा आहे. आपण ३० लाख डोस देत आहोत. आपण रोज ८० लाख डोस द्यायला हवेत. हे फक्त सरकारचे प्रयत्न होऊ शकत नाहीत. यात आपण सर्वांना एकत्र यावे लागेल. आता ब्रिटिश राजवट नाही. लोकनियुक्त सरकारसमोर नेहमीच असहकार आंदोलन करू शकत नाहीत.

बुद्धावर पुस्तक लिहिण्याची प्रेरणा कोठून मिळाली?
लॉकडाऊनमुळे. माझे प्रेरणास्थान नेहमीच बुद्ध आहेत असे मला वाटले. या देशाला गौतम बुद्धाने प्रभावित केले आहे. या लॉकडाऊनचा फायदा घेत मी माझ्या मनाची इच्छा पूर्ण केली. सत्तेतून बाहेर असल्याने वेळ मिळाला. यादरम्यान २ पुस्तके लिहिली आहेत. सध्या २०२४ पर्यंत वेळ आहे. यानंतर बहुदा एवढा वेळ मिळणार नाही.

बातम्या आणखी आहेत...