आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काँग्रेसचे जेष्ठ नेते मोतीलाल वोरा (93) यांचे सोमवारी निधन झाले. दिल्लीतील फोर्टिस हॉस्पीटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वोरा दोन वेळेस मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते. तसेच, 2000 ते 2018 पर्यंत (18 वर्षे) काँग्रेसचे कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली. वोरा यांनी कालच (20 डिसेंबर) आपला 93 वा वाढदिवस साजरा केला होता.
Vora ji was a true congressman and a wonderful human being. We will miss him very much.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 21, 2020
My love & condolences to his family and friends. pic.twitter.com/MvBBGGJV27
राहुल गांधींनी व्यक्त केले दुःख
राहुल गांधींनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहीले की, वोराजी सच्चे काँग्रेसी आणि एक उत्कृष्ट व्यक्ती होते. त्यांची कमतरता भासेल. त्यांच्या कुटुंबाबद्दल शोक व्यक्त करतो.
मध्यप्रदेशच्या राजकारणातील महत्वाचा चेहरा
1968 मध्ये समाजपार्टीचे सदस्य राहिलेले वोरा मध्यप्रदेशच्या दुर्ग म्यूनिसिपल कमेटीचे सदस्य बनले. त्यानंतर 1970 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1972 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडूण गेले. यानंतर 1977 आणि 1980 मध्येही आमदार झाले. अर्जुन सिंह यांच्या कॅबिनेटमध्ये पहिल्या उच्च शिक्षण विभागात राज्य मंत्रीपद भूषवले. 1983 मध्ये कॅबिनेट मंत्री बनले.
13 फेब्रुवारी 1985 मध्ये वोरा यांना मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री बनवण्यात आले. यानंतर 13 फेब्रुवारी 1988 ला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन 14 फेब्रुवारी 1988 मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली. 26 मे 1993 ते 3 मे 1996 पर्यंत ते उत्तर प्रदेशचे राज्यपालही होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.