आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन संसदेपासून रस्यापर्यंत गोंधळ सुरू आहे. याच पार्श्वभूमिवर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आज उत्तर प्रदेशातील रामपूर गावात जात आहेत. 26 जानेवारीला दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाशी प्रियंका भेटणार आहे.
दरम्यान, रामपुरकडे जात असताना हापुडमध्ये प्रियंका यांच्या ताफ्यात अपघात झाला. यात एका गाडीचे खूप नुकसान झाले आहे. चांगली बातमी म्हणजे, या अपघातात कोणलाही इजा झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका यांच्या गाडीचा वायपर काम करत नसल्यामुळे ड्रायव्हरने अचानक ब्रेक दाबले. यामुळे मागून येणाऱ्या गाड्यांनाही ब्रेक दाबावे लागले आणि यातच गाड्या एकमेकांवर धडकल्या.
Delhi: Congress leader Priyanka Gandhi is en route to Rampur, Uttar Pradesh
— ANI (@ANI) February 4, 2021
Visuals from the Sahibabad area pic.twitter.com/eBlKixVH45
रॅलीमध्ये ट्रॅक्टर पलटल्यामुळे झाला होता शेतकऱ्याचा मृत्यू
कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना 26 जानेवारीला दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅली काढली होती. यादरम्यान आंदोलक शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी तोडफोड केली. यावेळी उत्तर प्रदेशातील रामपूरचे शेतकरी नवरीत सिंह ट्रॅक्टर पलटल्यामुळे मृत्यूमुखी पडले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.