आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Congress Leader Rahul Gandhi Congress Rahul Gandhi Latest Attacks On Narendra Modi Government Over Shramik Special Trains Revenue

श्रमिक ट्रेनवर राहुल गांधी vs रेल्वेमंत्री:संकटाचे रुपांतर नफ्यात करुन सरकार पैसे कमावतेय, राहुल गांधींचा आरोप, तर पीयूष गोयल म्हणतात - केवळ देशाला लुबाडणारेच अनुदानाला नफा म्हणू शकतात

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रमिक स्पेशल ट्रेनशी संबंधित माध्यमांच्या अहवालाचा संदर्भ देताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आरोप करत म्हटले की, हे सरकार गरीब विरोधी आहे
  • रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी पलटवार करत म्हटले - आता लोक विचारत आहेत की सोनियाजींच्या तिकिटाचे पैसे देण्याच्या आश्वासनाचे काय झाले?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी पुन्हा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. लॉकडाऊनच्या वेळी धावणाऱ्या श्रमिक स्पेशल ट्रेनच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्रातील भाजपा सरकार गरीब विरोधी असल्याचा आरोप राहुल यांनी केला. राहुल म्हणाले की, केंद्र सरकार आपत्तीला नफ्यात बदलून पैसे कमाविण्यात गुंतले आहे.

यानंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही ट्विट करुन राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ट्वीट केले की केवळ देशाला लुबाडणारेच अनुदानाला नफा म्हणू शकतात. रेल्वेने राज्य सरकारपेक्षा खूप जास्त पैसे श्रमिक ट्रेन चालवण्यात खर्च केला आहे. कॉंग्रेसच्या कामगारांच्या तिकिटाचा खर्च उचलण्याचे आश्वासनावर गोयल म्हणाले की, आता लोक विचारत आहेत की, सोनियाजींच्या तिकिटाचे पैसे देण्याच्या आश्वासनाचे काय झाले?

लोक संकटात आहे आणि सरकार नफा कमावतेय - राहुल गांधी

त्यांनी ट्विट करत श्रमिक स्पेशल ट्रेनसंबंधीत एका मीडिया रिपोर्टला टॅग करत लिहिले की, देशावर कोरोनाचे संकट घोंघावत आहे. लोक संकटात आहेत. मात्र सरकार संकटाला नफ्यात बदलण्यात व्यस्त आहे. राहुल यांनी ज्या मीडिया रिपोर्टाल आपल्या ट्विटमध्ये टॅग केले आहे. त्यामध्ये दावा केला आहे की, लॉकडाऊनच्या काळात प्रवासी मजूरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या श्रमिक ट्रेनमधून रेल्वेला 428 कोटींचा फायदा झाला आहे.