आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Congress Leader Rahul Gandhi Criticize PM Narendra Modi On Corona Outbreak And Peacock

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसची टीका:एका व्यक्तीच्या अहंकारामुळे देशभरात कोरोनाचा उद्रेक; नागरिकांनी आपला जीव स्वतः वाचवावा, कारण पंतप्रधान मोरासोबत व्यग्र, राहुल गांधींचा मोदींवर घणाघात

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल गांधी यांनी ट्वीट करून मोदी सरकारवर निशाणा साधला

देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे चिंतेचे वातावरण आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी म्हणाले की, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या या आठवड्यात 50 लाख तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 10 लाख पार होईल. कोणतेही नियोजन न करता केलेला लॉकडाऊन एका व्यक्तीच्या अहंकाराचा परिणाम आहे. त्यामुळे संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग झाला, अशी टीका राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केली. तसेच, 'मोदी सरकार म्हणाले की, आत्मनिर्भर व्हा, याचा अर्थ असा होत आहे की, तुम्ही तुमचा जीव स्वत: वाचवा, कारण पंतप्रधान मोरांसोबत व्यस्त आहे, अशी खिल्लीही राहुल गांधींनी उडवली.