आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Congress Leader Rahul Gandhi On Corona And Lockdown; We Need To Decentralise Fight Against COVID Says Rahul, News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनावर काँग्रेस:'सोबत मिळून या महामारीचा सामना कराण्याची गरज आहे, सर्वच निर्णय पीएमओने घेतले तर मोठे संकट येईल'-राहुल गांधी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'लॉकडाउनच्या स्ट्रॅटजीमध्ये केंद्र, राज्य आणि नागरिकांची एकमेकांना मदत गरजेची'
  • '50% कुटुंबाच्या खात्यामध्ये थेट रक्कम पाठवावी, लहान उद्योगांना मदतीची गरज'

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज व्हिडिओ कॉन्फ्रंसिंगद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, हा वेळ आरोप करण्याचा नाही. आपल्याला लॉकडाउन उघडण्यासाठी एक स्ट्रँटजी बनवावी लागेल. लॉकडाउन एखादे ऑन-ऑफ स्विच नाही, तर एक ट्रांजिशन (परिवर्तनची वेळ)आहे. यासाठी केंद्र, राज्य आणि जनतेने एकमेतांना मदत करण्याची गरज आहे. कोरोनाविरोधातील लढाईला डी-सेंट्रलाइज करण्याची गरज आहे. सर्व निर्णय पंतप्रधान कार्यालयातूनच होत असतील, तर भविष्यात मोठे संकट येऊ शकते.

कोरोनाचे झोन राज्य स्तरावर तयार व्हावे: राहुल

राहुल पुढे म्हणाले की, तुम्ही कोणत्याही बिझनसमनला विचारले, तर तो हेच म्हणनार की, इकोनॉमिक सप्लाय चेन आणि कोरोनाच्या झोनमध्ये कोणताच ताळमेळ नाही. संक्रमणाच्या परिस्थितीच्या आधारावर रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन राष्ट्रीय स्तरावर ठरवले जात आहेत. पण, हे काम राज्य स्तरावर जिल्हा प्रशासनासोबत मिळून तयार व्हावेत. आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री म्हणत आहेत की, केंद्राने ठरवले रेड झोन, मुळात ग्रीन झोन आहेत.

'अर्थव्यवस्थेला लवकर सुरू करण्याची गरज'

राहुल पुढे म्हणाले की, सरकार लॉकडाउन उघडण्याच्या तयारीत असेल, तर आधी त्यांनी लोकांच्या मनातून आजाराबद्दलचे गैरसमज दूर करावेत. काँग्रेसच्या न्याय योजनेच्या आयडियावर सरकारने देशाच्या 50% कुटुंबाच्या खात्यात थेट पैसे ट्रासंफर करावेत. आपल्याला रोजगार देणाऱ्यांचीही काळजी घेण्याची गरज आहे. त्यांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे. देशाची आर्थव्यवस्था लवकरात लवकर सुरू करण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...