आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress Leader Rahul Gandhi On The Former Madhya Pradesh CM Kamal Nath Item Remark News

कमलनाथ यांना 45 तासांनंतर पुन्हा फटकार:'आयटम' संबंधित वक्तव्यावर राहुल गांधी म्हणाले - भाषा चांगली वाटत नाही, कमलनाथ म्हणाले - मी माफी का मागू?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कमलनाथ यांनी रविवारी डबरामध्ये निवडणुक रॅलीदरम्यान शिवराज कॅबिनेटच्या मंत्री इमरती देवींना आयटम म्हटले होते

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या आयटम संबंधित वक्तव्यावर काँग्रेस नेता राहुल गांधींनी जवळपास 45 तासांनंतर मंगळवारी तिखट प्रतिक्रिया दिली. राहुल म्हणाले की, कमलनाथ हे माझ्याच पक्षातील आहे, ते कुणीही का असेना, मात्र ज्या भाषेचा वापर त्यांनी केला आहे, मला वयक्तिकरित्या ते आवडलेले नाही.

कमलनाथांचा माफी मागण्यास नकार
कमलनाथ यांना राहुल गांधींच्या वक्तव्यावर उत्तर मागण्यात आले तेव्हा ते म्हणाले - मी कशा संदर्भात बोललो याविषयी त्यांना जे सांगण्यात आले, याविषयी त्यांचे ते मत आहे. मी तर स्पष्ट केले आहे की, मी कोणत्याविषयावर बोललो होतो. यामध्ये जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. मी माफी का मागेल, मी तर सांगितले आहे की, माझा उद्देश कुणाचाही अपमान करण्याचा नव्हता. जर कुणाला अपमानित वाटत असेल तर मला दुःख आहे आणि कालच मी हे बोललो आहे. शिवराज सिंहांनी जनतेमध्ये यावे आणि माफी मागावी. मी तर खेद व्यक्त केला आहे.

कमलनाथ यांनी रविवारी डबरामध्ये निवडणुक रॅलीदरम्यान शिवराज कॅबिनेटच्या मंत्री इमरती देवींना आयटम म्हटले होते. कमलनाथांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि भाजप नेता ज्योतिरादित्य सिंधिंयांसह अनेक नेत्यांनी मौन धारण केले.

कमलनाथ आणि इमरती देवी यांच्यात झाले वाक् युद्ध
जेव्हा कमलनाथ यांच्या विधानावरील वाद वाढला तेव्हा त्यांनी स्पष्टीकरण दिले की आयटम अवमानकारक शब्द नाही. आमदाराचे नाव आठवत नव्हते, म्हणून ते बोलले. दुसरीकडे, इमरती देवी उत्तरात म्हणाल्या - तो (कमलनाथ) बंगालचा माणूस आहे, त्यांना महिलेचा सन्मान काय माहिती. खुर्ची गेल्याने ते पागल झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...