आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Congress Leader Rahul Gandhi Slams On Narendra Modi Govt Over Coronavirus Lockdown

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाउनवर राजकारण:दरवेळेस तोच तो मूर्खपणा केला जातो आणि वेगळ्या निकालांची अपेक्षा केली जाते; लॉकडाउनवरून राहुल गांधींचा सरकरला टोला

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल गांधींनी ग्राफ जारी करून सांगितले, लॉकडाउनच्या कोणत्या टप्प्यात किती कोरोनाग्रस्त

लॉकडाउन आणि कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. राहुल यांनी एक ग्राफ ट्विट केला. त्यामध्ये लॉकडाउनच्या 4 टप्प्यांमध्ये किती रुग्ण वाढले याचा आराखडा मांडण्यात आला आहे. लॉकडाउनवर बोलताना ते म्हणाले, की प्रत्येकवेळी तोच तो मूर्खपणा केला जातो आणि वेगळ्या निकालांची अपेक्षा केली जाते.

चुकीच्या शर्यत जिंकण्याच्या वाटेवर भारत

तत्पूर्वी राहुल गांधींनी शुक्रवारी देखील एक ट्विट करून सरकारवर निशाणा साधला होता. त्यामध्ये भारत एक चुकीची शर्यत जिंकण्याच्या वाटेवर आहे असे ते म्हणाले होते. त्यांचे बोट कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर होते. देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे जगातील सर्वाधिक रुग्णांच्या बाबतीत भारत वर सरकत आहे. त्यावरूनच राहुल गांधी बोलत होते. हे सर्व काही उद्धटपणा आणि स्पर्धा न करण्याची वृत्ती यामुळेच होत असल्याचे राहुल गांधी म्हणाले आहेत.

लॉकडाउनचा हेतूच फेल ठरला -राहुल गांधी

कोरोना संकटावर केलेल्या उपाययोजना आणि लॉकडाउनच्या टायमिंगवर काँग्रेसने नेहमीच टीका केली. सरकारने जेव्हा अनलॉकची घोषणा केली तेव्हा राहुल गांधी म्हणाले होते, की आता देशात कोरोना झपाट्याने वाढत आहे आणि सरकार लॉकडाउन उठवत आहे. मुळात लॉकडाउनचा हेतूच फेल ठरला आणि देशाला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.

बातम्या आणखी आहेत...