आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Congress Leader Rahul Gandhi Statement On India China Ladakh Border Dispute; Says Chinese Army Entered Indian Territory

राहुल गांधी सरकारवर पुन्हा बसरले:म्हणाले - चीनने आपल्या भूमीवर कब्जा केला, त्यांना असे करू देणे देशद्रोह; राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त झाली तरी मी सत्यच बोलणार

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मी सॅटेलाइट इमेज पाहिली, माजी जवानांशी बोललो; सर्व माहीत असूनही मी खोटे बोलू शकत नाही - राहुल

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा चीनने आपली जमीन ताब्यात घेतल्याचा पुनरुच्चार केला आहे. सोमवारी केंद्र सरकारवर हल्ला चढवत ते म्हणाले की, देशातून सत्य लपवून ठेवणे आणि चीनला तसे करण्यास परवानगी देणे हा देशद्रोह ठरेल. मी चीनबद्दल नेहमीच सत्य बोलेल. मग यासाठी आपली राजकीय कारकीर्द पणाला लावावी लागली तरी चालेल.

राहुल आपल्या नवीन व्हिडिओमध्ये म्हणाले की, भारताच्या जमिनीवरील चीनच्या ताब्याबाबत देशाच्या जनतेशी खरे बोलने हीच खरी देशभक्ती आहे.

सत्य माहित असूनही मी खोटे बोलू शकत नाही : राहुल

सीमा विवादावर पंतप्रधानांचे प्रश्न देशाला चीनविरुद्ध कमकुवत करीत आहेत, या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, चीनच्या सैन्याने आमच्या भागात प्रवेश केला हे आता स्पष्ट झाले आहे. या गोष्टीने मला त्रास झाला आहे. एखाद्या देशाने आपल्या प्रदेशात प्रवेश करत आपल्या जमिनीवर ताबा कसा घेतला त्याबद्दल माझे रक्त उसळते.

ते म्हणाले की, एक राजकारणी म्हणून तुमची इच्छा असेल की मी गप्प बसावे आणि लोकांशी खोटे बोलावे तर मी असे करू शकत नाही. जर या सगळ्या प्रकरणानंतर माझी राजकीय कारकीर्द पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असली तरी, मला फरक पडणार नाही. राहुल म्हणाले की, त्यांच्यासाठी देश आणि देशातील लोक प्रथम आहेत.

केंद्र सरकारवर लावला खोटे बोलल्याचा आरोप

राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर खोटे बोलल्याचा आरोप करत म्हटले की, आपल्या भूमीवर चीनच्या घुसखोरीबद्दल खोटे बोलणारे लोक देशभक्त असूच शकत नाहीत. ते म्हणाले की, जर ही बाब आपल्या देशाशी आणि त्या संबंधित क्षेत्राची असेल तर मी नेहमीच सत्य बोलणार.