आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress Leader Rahul Gandhi Will Unveil The Strategy Of Stalin's Autobiography Today | Marathi News

तामिळनाडू:स्टॅलिन यांच्या आत्मचरित्राद्वारे विरोधी एकजुटीची रणनीती, काँग्रेस नेते राहुल गांधी आज करणार विमोचन

तामिळनाडू / रामकुमार आर.6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडूचे मुख्यमंत्री व द्रविड मुनेत्र कळघमचे (डीएमके) प्रमुख एम.के. स्टॅलिन यांची आत्मकथा ‘उंगालिल आेरुवन’ (आपल्यापैकी एक) या पुस्तकाचे विमोचन सोमवारी होणार आहे. विमाेचनाच्या निमित्ताने हे व्यासपीठ प्रमुख विरोधी पक्षांची एकजूट दर्शवणारे ठरेल. कारण पुस्तकाचे विमाेचन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावणार असल्याच्या अटकळी सुरू असतानाच स्टॅॅलिन यांच्या आत्मचरित्राचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाला काँग्रेस नेत्यांव्यतिरिक्त केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, जम्मू-काश्मीरचे उमर अब्दुल्ला, बिहारमधील विरोधी नेते तेजस्वी यादव देखील हजेरी लावणार आहेत. या समारंभात सहभागी होणारे एक वरिष्ठ द्रमुक नेते म्हणाले, निमंत्रणाच्या यादीत आणखी नावे समाविष्ट केली जात आहेत. यादीत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचेही नाव आहे. परंतु अद्यापपर्यंत कार्यक्रमात सहभागी होण्याविषयी ममतांनी सहमती दर्शवलेली नाही.

कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही भाजपविरोधी पक्षांची एकजूट साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. या कार्यक्रमाच्या पाहुण्यांची यादी पाहिल्यास गैरभाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना तसेच विरोधी नेत्यांची भाजपच्या विरोधात एकजूट करण्यात येणार आहे. अलीकडेच स्टॅलिन यांनी देशातील ३७ राजकीय पक्षांना पाठिंब्यांचे आवाहन केले होते. फोरम ऑल इंडिया फेडरेशन फॉर सोशल जस्टिसमध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले होते. द्रमुकचे वरिष्ठ नेते दुरई मुरगन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तामिळ अभिनेता सत्यराज पुस्तकाचा परिचय करून देतील.

आत्मचरित्र दोन भागांत
पहिल्या भागात स्टॅलिन यांचा १९७६ पर्यंतचा संघर्ष मांडण्यात आला आहे. त्यात विद्यार्थी आंदोलनातून त्यांनी राजकारणात कसा प्रवेश केला हे विशद करण्यात आले आहे. पेरियार, मुख्यमंत्री अण्णादुरई, वडील करुणानिधी यांच्यासारख्या नेत्यांकडून राजकारण आणि समाजसेवेचे बाळकडू कसे घेतले या गोष्टी आहेत. पेरियार, अण्णादुराई, करुणानिधी यांच्यासह द्रविड आंदोलनाचे संस्थापक नेत्यांद्वारे संघर्षाचाही उल्लेख आहे. आणीबाणीच्या काळात स्टॅलिन यांना मसिआअंतर्गत ताब्यात घेण्यात आले. त्याचाही उल्लेख आहे. आत्मचरित्राचा दुसरा भाग वर्षाखेरीस येईल, असे द्रमुकने स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...