आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राजस्थान:'तुमची काँग्रेसवर खरच निष्ठा आणि प्रेम असेल तर संकोच न बाळगता परत या', काँग्रेसचे सचिन पायलट यांना परत येण्याचे आवाहन

जयपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंडखोरीच्या दिशेने जात असलेले सचिन पायलट यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतर परत एकदा काँग्रेसने पायलट यांना पक्षात येण्याची विनंती केली आहे. 'तुम्हची भाजपमध्ये जाण्याची इच्छा नसेल, तर भाजप नेते आणि हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या सुरक्षाचक्राला भेदून परत आपल्या घरी या', असे आवाहन काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पायलट यांना केले आहे.

सुरजेवाला म्हणाले की, 'सचिन पायलट तुम्ही खरच भाजपमध्ये जावू इच्छित नसाल तर मनोहरलाल खट्टर यांच्या सुरक्षाचक्राला तोडून आयटीसी ग्रँड लेमन ट्री हॉटेलमधून बाहेर पडा आणि भाजप नेत्यांशी चर्चा करणं बंद करा. कुटुंबाच्या सदस्यासारखं घरी परत या. काँग्रेस खुल्या मनाने तुमचे म्हणने ऐकूण घेण्यासाठी तयार आहे.''

''काँग्रेसने पायलट यांना कमी वयात अनेक चांगली पदे दिली. खासदार ते केंद्रीय मंत्री, निवडणुकीत पराभव झाल्यानंतर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षापासून ते राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत अनेक संधी देत प्रोत्साहित केले. एवढं प्रोत्साहन तर कोणत्याच राजकीय पक्षाने कुणालाही दिले नसेल. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आवाहन केलंय की, तुमची काँग्रेसवर खरच निष्ठा आणि प्रेम असेल तर ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये तुम्हा आहात त्या हॉटेलच्या बाहेर येवून तुम्ही प्रासारमाध्यमांना काँग्रेसवर आपली संपूर्ण निष्ठा आहे, असे सांगा,'' असे रणदीप सुरजेवाला म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, ''पायलट यांच्यासोबत भरकटलेल्या प्रत्येक आमदाराला माझा सल्ला आहे की, कुटुंबात परत येण्यासाठी संकोच बाळगू नका. माध्यमांद्वारे बोलू नका. परत या आणि तुमचे म्हणने मांडा, सविस्तर चर्चा करा. तुम्हाला जर वाटत असेल की, काँग्रेस आमदारांचे बहुमत तुमच्याजवळ आहे, तर या आणि आपले बहुमत सिद्ध करा. तुमचा जो अधिकार आहे तो अधिकार तुम्ही घ्या.''