आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस नेत्याचा हवाई सुंदरीवर बलात्कार:पीडित तरुणीने आरोपीला घरात केले बंद, पोलिसांना बोलावून ठोकल्या बेड्या

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजधानी दिल्लीच्या महरौली भागात काँग्रेसच्या एका नेत्याने हवाई सुंदरीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. गत रविवारी ही घटना घडली. त्यानंतर पीडितेन आरोपीला घरात बंद करून 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना बोलावले. त्यानंतर या आरोपीला बेड्या घालण्यात आल्या.

दक्षिण दिल्लीच्या डीसीपी चंदन चौधरी यांनी सांगितले की, महरौली पीजीआरमधील एका महिलेने 112 वर फोन केला होता. महिला एअर होस्टेस अर्थात हवाई सुंदरी आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता महिलेने सांगितले की, हरिजीत यादव नामक व्यक्तीने, जी त्याला मागील दीड महिन्यापासून ओळखते, दारुच्या नशेत तिच्यावर बलात्कार केला.

हरिजीत यादव खानपूर काँग्रेसचा ब्लॉक प्रमुख आहे. हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हरिजीत यादव खानपूर काँग्रेसचा ब्लॉक प्रमुख आहे. हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पोलिसांनी हरिजीतच्या घरातूनच मुसक्या आवळल्या. हरिजीत खानपूरचा असून, काँग्रेसचा गट प्रमुख आहे. पोलिसांनी या प्रकरणी महिलेच्या तक्रारीच्या आधारावर बलात्कार, जाणिवपूर्वक शरीराला नुकसान पोहोवचण्याचा एफआयआर दाखल केला आहे.

मैत्री कशी झाली? पोलिसांकडून तपास सुरू

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे. आरोपी व पीडितेची मैत्री कशी झाली पोलिस याचाही तपास करत आहेत. दोघे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले की अन्य एखाद्या मार्गाने याचाही धुंडाळा घेतला जात आहे. तसेच आरोपीचे इतर कनेक्शन्सचाही शोध घेतला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...