आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Congress Leader Shashi Tharoor Acquitted In Sunanda Pushkar Death Case, Delhi Court Rules

थरुर यांना मोठा दिलासा:सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणातून काँग्रेस नेते शशी थरूर यांची निर्दोष मुक्तता, म्हणाले- 7 वर्षांच्या वेदनेतून आता मुक्त झालो

2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणी काँग्रेस खासदार शशी थरूर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात दिल्लीच्या एका विशेष न्यायालयाने बुधवारी थरूर यांची निर्दोष मुक्तता केली आहे. सुनंदाचा मृतदेह 2014 मध्ये दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये सापडला होता.

पुष्करच्या मृत्यूनंतर तिचे पती शशी थरूर यांच्यावर मानसिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. बुधवारी निकाल आल्यानंतर थरूर यांनी न्यायालयाचे आभार मानले आणि म्हणाले की मी गेल्या 7 वर्षांपासून वेदना आणि छळ सहन करत होतो.

विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांनी निकाल देताना हे प्रकरण रद्द केले. थरूर यांच्यातर्फे वकील विकास पहवा न्यायालयात हजर झाले होते. राज्य सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अतुल श्रीवास्तव उपस्थित होते. कार्यवाही व्हर्चअली (ऑनलाइन) केली गेली. थरूर यांचाही यामध्ये सहभाग होता. न्यायालयाने 12 एप्रिल रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता.

सुनंदाने एका मित्राला सांगितले होते- पतीचे दुसऱ्या महिलेशी संबंध होते

सुनंदा पुष्कर यांची मैत्रीण ज्येष्ठ पत्रकार नलिनी सिंह यांनी निवेदनात म्हटले होते की, थरूर हे मेहर तरार नावाच्या महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये होते. सुनंदा यांनी त्यांना सांगितले होते की, थरूर आणि मेहर जून 2013 मध्ये दुबईच्या एका हॉटेलमध्ये तीन रात्री एकत्र राहिले होते. एका दिवशी सुनंदाने नलिनीला फोन केला, तेव्हा ती खूप दुःखी होती. थरूर आणि मेहेर यांच्यांमध्ये मॅसेजमधून संभाषण होते. एका संदेशात असेही लिहिले होते की, शशी थरूर निवडणुकीनंतर सुनंदाला घटस्फोट देण्याची तयारी करत होते.

सुनंदाचा मृतदेह दिल्लीतील एका हॉटेलमध्ये सापडला
17 जुलै 2014 रोजी दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू झाला. तेथील एका आलिशान खोलीतील बेडवर त्यांचा मृतदेह आढळून आला. प्रदीर्घ तपासानंतर दिल्ली पोलिसांनी तिचा पती शशी थरूर याच्यांविरुद्ध IPC 498A (पती किंवा त्याच्या नातेवाईकाकडून महिलेवर क्रूरता) आणि 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

शवविच्छेदन अहवालात काय उघड झाले?

 • सुनंदाच्या शरीरात अल्कोहोलचे कोणतेही ट्रेस सापडले नाहीत.
 • सुनंदाच्या चेहऱ्यावर आणि हातावर 10 पेक्षा जास्त स्क्रॅचच्या खुणा होत्या. मात्र, त्याला प्राणघातक म्हटले जाऊ शकत नाही.
 • अहवालानुसार सुनंदाचा मृत्यू नैसर्गिक नव्हता.
 • सुनंदाच्या मृत्यूचे मुख्य कारण डिप्रेशन औषध अल्प्राझोलमचा ओव्हरडोस असू शकतो.
 • पोलिसांना सुनंदाच्या खोलीतून अल्प्राझोलम (अल्प्रॅक्स) च्या दोन रिकाम्या स्ट्रिप्स सापडल्या. सुनंदाने बहुधा 27 गोळ्या खाल्ल्या होत्या.
 • तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अल्प्राझोलमचा अती सेवनाने मेंदूच्या कार्यावर परिणाम पडतो. बेशुद्ध होणे आणि मृत्यूची शक्यता असते.
 • सुनंदाचा मृत्यू विषबाधेमुळे झाला, मात्र, पोस्टमॉर्टम अहवालात ना आत्महत्या नाकारण्यात आली ना त्याची पुष्टी करण्यात आली. सूत्रांनी विषाचे स्वरूप उघड केले नाही.
 • शवविच्छेदन अहवालात सुनंदाचा संध्याकाळी 4 ते 7 च्या दरम्यान मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
 • एका इंग्रजी वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, पोस्टमार्टम अहवालात म्हटले आहे की सुनंदाचा मृत्यू औषधांच्या अतिसेवनामुळे झाला नाही. उलट जादा डोस जाणीवपूर्वक दिला गेला.
बातम्या आणखी आहेत...