आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया:मी ब्रेक ठीक करू शकत नाही, म्हणून हॉर्नचा आवाज वाढवून दिला, अर्थसंकल्पावर शशी थरून यांची बोचरी टीका

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेस नेते शशी थरूर यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यावर सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. कोरोनाच्या महामारीमुळे अडचणीत सापडलेल्या आपल्या देशाची पुढील दिशा काय असणार हे आजच्या अर्थसंकल्पात पाहायला मिळाले. यावर्षीच्या अर्थसंकल्पात आरोग्य, शेती, उद्योग, शिक्षण, रेल्वे, क्रीडा, वाहतूक आदी क्षेत्रांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अर्थसंकल्पावरून विरोधक सरकारवर टीका करत आहेत तर सत्ताधारी हा अर्थसंकल्प कसा उपयुक्त आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

काय म्हणाले शशी थरूर?

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यावर सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. ‘हे भाजप सरकार मला गॅरेज मेकॅनिकची आठवण करून देते, ज्याने आपल्या ग्राहकाल सांगितले की, मी आपले ब्रेक ठीक करू शकत नाही, म्हणून मी हॉर्नचा आवाज वाढवून दिला’ अशी शब्दांत सोशल मीडिया पोस्ट करत थरूर यांनी अर्थसंकल्पावर बोचरी टीका केली आहे.

बातम्या आणखी आहेत...