आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Congress Left Parties Alliance West Bengal News Update: Adhir Ranjan Chowdhury | West Bengal Assembly (Vidhan Sabha) Election 2021 Latest News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॅटल ऑफ बंगाल:विधानसभा निवडणुकीत काँग्रेस डाव्यांसोबत लढणार, हाय कमांडकडून मिळाली परवानगी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेस किती जागांवर लढेल, अजून ठरले नाही

काँग्रेस हाय कमांडने पश्चिम बंगालमध्ये 2021 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत डाव्यांसोबत आघाडी करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे आता बंगालच्या निवडणुकीत तिकोण पाहायला मिळणार आहे. येथे सत्ताधारी तृणमूल आणि भाजपसोबतच आता काँग्रेस-लेफ्ट अलायंसदरम्यान लढाई होईल.

पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी म्हणाले की, काँग्रेसने परत एकदा डाव्यांसोबत मिळून तृणमूल सरकारविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे राज्य प्रभारी जितिन प्रसाद म्हणाले की, आमची आघाडी संपूर्ण ताकतीने तृणमूल आणि भाजपविरोधात लढेल आणि बंगालच्या त्या गौरवाला पर आणले, ज्याला या दोन्ही पक्षांनी नष्ट केले आहे.

काँग्रेस किती जागांवर लढेल, अजून ठरले नाही

2016 मध्ये काँग्रेसने डाव्यांसोबत निवडणुक लढवली होती. तेव्हा या आघाडीला 44 जागा मिळाल्या होत्या. परंतू, तेव्हापासून काँग्रेसचे अर्ध्यापेक्षा जास्त आमदार तृणमूलमध्ये सामील झाले आहेत. यावेळेस काँग्रेस किती जागांवर लढेल, हे अद्याप ठरलेले नाही. परंतू, सूत्रांनी सांगितल्यानुसार, काँग्रेसला बरोबरीचा वाटा मिळण्याची शक्यता आहे.

2016 बंगाल विधानसभा निवडणुकीची स्थिती

एकूण जागा: 294

पक्षाजागा जिंकल्यावोट शेअर
तृणमूल21145.6%
काँग्रेस4412.4%
भाजप310.3%
लेफ्ट2620.1%
बातम्या आणखी आहेत...