आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress | Manishankar Ayyar | "India Has Been A Slave To America Since 2014"; After Kangana, Now Congress Leader Mani Shankar Aiyar's Controversial Statement

अय्यरांचे भाजपवर टीकास्त्र:“2014 पासून भारत अमेरिकेचा गुलाम”; कंगनानंतर आता काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचे वादग्रस्त विधान

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री कंगना रनोट हिने भारताच्या स्वातंत्र्याबद्दल एक खळबळजनक विधान केले होते. तिच्या त्या वक्तव्यानंतर देशभरात तिच्यावर टीका करण्यात येत होती. "देशाला खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले" असे कंगना म्हणाली होती. कंगनानंतर आता काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने देखील वादग्रस्त वक्तव्य केले आहे. "2014 पासून भारत अमेरिकेचा गुलाम झाला आहे" असे काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी म्हटले आहे.

इंडो-रशिया फ्रेंडशिप सोसायटीच्या एका कार्यक्रमात अय्यर म्हणाले की, 2014 पासून आपण अमेरिकेचे गुलाम झालो आहोत. अय्यर यांनी आपल्या भाषणात भारत रशिया संबंधांचा उल्लेख करत आपले विधान सिद्ध करण्याचा प्रयत्न देखील केला.

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर म्हणाले की, “गेल्या 7 वर्षांपासून आपण पाहत आहोत की, पक्षांतराची कोणतीही चर्चा होत नाही. शांततेची चर्चा नाही. ते अमेरिकन लोकांचे गुलाम बनून बसले आहेत आणि ते म्हणतात चीनपासून वाचले पाहिजे. भारत-रशियाचे संबंध वर्षानुवर्षे जुने आहेत, पण मोदी सरकार आल्यापासून हे नाते कमकुवत झाले आहे. 2014 पर्यंत रशियाशी आमचे जे संबंध होते, ते सध्याच्या काळात खूपच कमी झाले आहेत." असे अय्यर म्हणाले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी अय्यर यांनी मध्ययुगीन इतिहासाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते की, “अकबरने देशावर 50 वर्षे राज्य केले. हे लक्षात घेऊन मी राहत असलेल्या रस्त्याचे नाव अकबर रोड असे ठेवले. आमची हरकत नव्हती. महाराणा प्रताप रस्ता बनवा असे आम्ही कधीच म्हटले नाही, कारण आम्ही अकबराला आपलाच मानतो आणि त्याला परकं मानत नाही." असे वादग्रस्त विधान अय्यर यांनी केले होते.

कंगना काय म्हणाली होती
अभिनेत्री कंगना रनोट म्हणाली होती की, देशाला खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मोदी सरकार आल्यापासून मिळाले आहे. यापूर्वी मिळाली ती भीक होती. अशा शब्दात कंगनाने सगळ्या स्वातंत्रवीरांचा अपमान केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर कंगनाला ट्रोल केले जात होते.

बातम्या आणखी आहेत...