आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देणगीवर प्रश्नचिन्ह:राम मंदिरासाठी पैसे गोळा करतात आणि त्याच पैशांनी रात्री दारू पिता; काँग्रेस नेत्याची जीभ घसरली

इंदूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपच्या बचावासाठी समोर आले प्रोटेम स्पीकर, म्हणाले - थेट ट्रस्ट खात्यावर जातोय पैसा

अयोध्येतील राम मंदिरासाठी निधी गोळा करण्याचे काम सध्या देशभर सुरु आहे. संघ परिवार आणि भाजपचे कार्यकर्ते घराघरामध्ये जावून या मंदिरासाठी स्वेच्छेने निधी गोळा करत आहेत. दरम्यान यावर वक्तव्य करताना झाबुआचे आमदार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कांतीलाल भूरिया यांची जीभ घसरली. 'भाजप नेते राम मंदिरासाठी सकाळी पैसे गोळा करतात या पैशांमध्ये रात्री दारु पितात,' असा आरोप भूरिया यांनी केला. त्यांच्या या आरोपाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

दरम्यान या वक्तव्यावरुन गदारोळ झाल्यानंतर, ज्येष्ठांच्या सन्मानार्थ काँग्रेसच्या रॅलीत भाग घेण्यासाठी आलेल्या भूरिया यांनी भगवान राम सगळ्यांचे असल्याचे म्हणत त्या विधानावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, "सर्वांनी आपल्या आस्थेनुसार दान करावे. मात्र मागील वेळी जो पैसा गोळा झाला होता, त्याचा हिशोब भाजप नेत्यांनी द्यावा. संध्याकाळी दारू पित असल्याचे लोक बोलत आहेत. मला जे समजले तेच मी म्हणालो."

थेट ट्रस्ट खात्यावर जातोय पैसा

दुसरीकडे भूरिया यांचे विधान समोर आल्यानंतर भाजप आमदार आणि प्रोटेम स्पीकर रामेश्वर शर्मा समोर आले. ही संपूर्ण देणगी थेट श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या बँक खात्यात वर्ग केली जात असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...