आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय:पुद्दुचेरीत काँग्रेसच्या आमदाराचा राजीनामा; उपराज्यपाल किरण बेदी यांनाही हटवले

पुड्डुचेरी8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेसचे सरकार डळमळीत, मुख्यमंत्र्यांचा मात्र बहुमताचा दावा

केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीत मंगळवारी घटनाक्रम वेगाने बदलला. सकाळी काँग्रेसचे आणखी एक आमदार ए. जॉन कुमार यांनी राजीनामा दिला. गेल्या काही दिवसांत राजीनामा देणारे ते चौथे आमदार आहेत. त्यामुळे विधानसभेत काँग्रेसच्या व्ही. नारायणसामी सरकारच्या बहुमताचा आकडा डळमळीत झाला. तथापि, आपल्याकडे बहुमत आहे, असा दावा नारायणसामी यांनी केला.

दरम्यान, सायंकाळी पुद्दुचेरीच्या उपराज्यपाल किरण बेदी यांना अचानक पदावरून हटवण्यात आले. राष्ट्रपती भवनातर्फे सांगण्यात आले की, बेदींना पदावरून मुक्त केले आहे. नव्या उपराज्यपालांची नियुक्ती होईपर्यंत तेलंगणच्या राज्यपाल सुंदरराजन तमीलसाई यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिला आहे. बेदी मंगळवार दुपारपर्यंत सामान्य दिवसांप्रमाणेच सक्रिय होत्या. त्यांनी राज्यात कोरोना व लसीकरणाचा आढावा घेतला. त्यांना हटवण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून होत होती. मुख्यमंत्री नारायणसामींनी त्यासाठी २ वेळा राजभवनबाहेर धरणे आंदोलन केले आहे.

असे आहे जागांचे गणित : पुद्दुचेरी विधानसभेत तीन नामनियुक्त सदस्यांसह एकूण सदस्य संख्या ३३ आहे. सध्या ही संख्या घटून २८ झाली आहे. बहुमतासाठी १५ सदस्यांची गरज आहे. काँग्रेसकडे स्वत:चे १० आमदार राहिले आहेत. द्रविड मुन्नेत्र कळघमचे तीन आणि एका अपक्षासह एकूण १४ आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे. विरोधातही एनआर काँग्रेसचे सात, अद्रमुकचे चार आणि भाजपच्या तीन (नामनियुक्त) आमदारांसह १३ आमदार आहेत.