आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेकफास्ट पॉलिटिक्स:कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये 14 विरोधी पक्षांना राहुल गांधी भेटले, कॉंग्रेसचे नेते बैठकीनंतर सायकलवरून संसदेत पोहोचले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुल गांधी यांची विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबतची नाश्ता बैठक संपली आहे. या बैठकीनंतर राहुल गांधी सायकलवरून संसदेसाठी रवाना झाले. महागाईवर विरोधी पक्ष सरकारला घेरण्याची तयारी करत आहे. कॉन्स्टिट्यूशन क्लबची बैठक होताच काँग्रेस नेते संसदेकडे वळले. राहुलसोबत विरोधी पक्षांचे नेतेही सायकलवरून संसदेत पोहोचले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज सकाळी विरोधी पक्षांच्या नेत्यांना नाश्त्यासाठी बोलावले होते. ब्रेकफास्ट पॉलिटिक्सच्या मदतीने विरोधकांना एकत्र ठेवण्यासोबतच पेगासस हेरगिरीसारख्या मुद्यांवर संसदेत सरकारची घेराबंदीची रणनीती आखण्याचा हेतू होता.

मोदी आम्हाला चहा सोडा पाणी सुद्धा विचारत नाहीत -संजय राउत
विरोधी पक्षांच्या खासदारांच्या बैठकीत शिवसेना खासदार संजय राउत देखील उपस्थित होते. यावेळी राउत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चहावरून टीका करण्याची संधी सोडली नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमोर उभे राहून बोलताना संजय राउत म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला चहावर चर्चा करण्यासाठी बोलावले तर आवश्य जाऊ. पण, पीएम मोदी आम्हाला पाणी सुद्धा विचारत नाहीत." संजय राउत यांचे हे वाक्य ऐकून उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उडाला.

या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, राजद, सपा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, माकप, IUML, क्रांतिकारी समाजवादी पक्ष (RSP), केरळ काँग्रेस (M), झारखंड मुक्ती मोर्चा, नॅशनल कॉन्फरन्स, तृणमूल काँग्रेस आणि लोकतांत्रिक जनता दल सहभागी होते. आम आदमी पार्टी बैठकीला उपस्थित राहिली नाही.

बातम्या आणखी आहेत...