आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress Needs Medicine, Treatment From 'compounder', Modi Showed Humanity At Least

गुलाम नबी आझादांची टीका:काँग्रेसला औषधाची गरज, पण उपचार ‘कंपाउंडर’कडून सुरू, मोदींनी माणुसकी तरी दाखवली

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस सोडल्यानंतर गुलाम नबी आझाद यांचे पक्षावरील हल्ले तीव्र होत आहेत. आझाद सोमवारी म्हणाले की, काँग्रेसचा पाया कमकुवत झाला असून तिची कधीही शकले उडू शकतात. नेतृत्वाकडे संघटनेची पडझड रोखण्यासाठी वेळ नाही. मी तर प्रार्थना करू शकतो. माझ्या प्रार्थनेमुळे काँग्रेस ठीक होऊ शकत नाही. त्यासाठी औषध पाहिजे. त्यासाठी जे डॉक्टर आहेत वास्तवात डॉक्टर नव्हे तर कंपाउंडर आहेत. आझाद यांनी पक्ष नेतृत्वावर आरोप केले की, शुक्रवारी पक्ष सोडला होता. त्यांचा “डीएनए’ मोदीमय झाल्याच्या काँग्रेसच्या आरोपावर आझाद यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत सांगितले की, नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यात जे लोक मदत करत आहेत त्यांनी मोदींशी हातमिळवणी केली आहे. नरेेंद्र मोदींनी काँग्रेसमुक्त भारत म्हटले होते. यात जे लोक त्यांची मदत करत आहेत त्यांची मोदींशी हातमिळवणी झाली आहे. हे लोक संसदेत भाषण देऊन त्यांची गळाभेट घेतात आणि म्हणतात आमचे मन स्वच्छ आहे. त्यांची हातमिळवणी झाली की नाही, असा सवाल त्यांनी केला.

भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता स्पष्टपणे फेटाळली राज्यसभेतील त्यांच्या निरोपादरम्यान पंतप्रधान मोदी भावुक झाले होते. त्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी अनेक लक्ष वेधले होते. त्यावर आझाद म्हणाले, मी मोदींना निर्दयी माणूस समजत होतो. मी विचार करत होतो, त्यांनी लग्न केले नाही,त्यांना मुलेही नाहीत. त्यामुळे त्यांना कोणाची पर्वा नाही. मात्र, किमान त्यांनी माणुसकी तरी दाखवली. आझाद यांच्यानुसार, राज्यसभेत मोदी आणि त्यांनी ढाळलेले अश्रू एकमेकांसाठी नव्हे तर अनेक वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी घटनेशी संबंधित विषयाबाबत होते. भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यतेबाबत आझाद म्हणाले, तसे काही नाही. यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये त्यांच्या राजकारणाला कोणत्याही प्रकारची मदत मिळणार नाही.

बातम्या आणखी आहेत...