आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्ष सरसावले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी बुधवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी यांची भेट घेतली. खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर राहुल म्हणाले की, पुढील वर्षी निवडणुकीपूर्वी विरोधकांच्या एकजुटीसाठी हा प्रथम औपचारिक पुढाकार आहे. आगामी काळात काँग्रेस अध्यक्ष इतर विरोधी पक्षांची भेट घेतील.
राहुल आणि खरगे बैठकीनंतर म्हणाले की, विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी ही ऐतिहासिक बैठक होती. सूत्रांच्या मते ३०० जागांवर भाजपविरोधात तगडे उमेदवार देण्याचा निर्णयही झाला आहे. नितीशकुमार यांनी मोदी हटावऐवजी भाजप हटाव, देश बचावच्या घोषणेसह बिहारमधून आंदोलन छेडण्याचा प्रस्ताव दिला. दरम्यान, रात्री उशिरा नितीशकुमार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचीही भेट घेतली.
जदयूचा दावा : नितीशच विरोधी एकतेचे सूत्रधार
खुर्चीच्या केंद्रस्थानी कोण? : बैठकीनंतर जदयूने ट्वीट केले की नितीशकुमार २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी एकतेचे मुख्य सूत्रधार होणार आहेत. नितीशनीतीनेच काम होईल. अर्थ : नितीशकुमारांना काँग्रेसप्रणीत विरोधी आघाडीत प्रमुख जबाबदारी मिळेल.
मात्र... आघाडीतील विरोधी पक्षांच्या संख्येवर सध्या काँग्रेसचे मौन
राहुल यांना आघाडीतील इतर विरोधी पक्षांच्या संख्येबाबत विचारले असता ते म्हणाले, ही निरंतर प्रक्रिया आहे. आम्ही एका अजेंड्यावर लढू. सूत्रांच्या मते तेलंगणचे बीआरएस व आपला जोडण्याची जबाबदारी नितीश यांनी घेतली. ते एकतेसाठी ममतांच्या संपर्कात राहतील.
अर्थ : काँग्रेसला माहीत आहे की बीजेडी, वायएसआर काँग्रेस हे बिगर भाजप पक्ष सध्या विरोधी आघाडीत सामील होण्याची घोषणा करणार नाहीत.
राहुल गांधींना शिक्षेनंतर १४ विरोधी पक्ष एकजूट झाले होते
मानहानी प्रकरणात राहुल यांना शिक्षा आणि नंतर खासदारकी गेल्या प्रकरणात १४ प्रमुख विरोधी पक्षांनी विरोध नोंदवला होता. यात काँग्रेससह तृणमूल, समाजवादी पार्टी, द्रमुक, एनसी, पीडीपी, राष्ट्रवादी, जदयू, राजद, आप, बीआरएसचा समावेश होता. { या १४ पक्षांनी २०१९ च्या निवडणुकीत ३९% मते मिळवून १६० जागांवर विजय मिळवला होता, तर भाजपला ३८% मते आणि ३०३ जागा मिळाल्या होत्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.