आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मंगळवारी जवळपास 18 तासांच्या काउंटिंग नंतर बिहारमध्ये निकाल स्पष्ट झाले आहेत. NDA 125 जागांसह सत्ता टिकवण्यात यशस्वी ठरली आहे. मात्र सर्वात जास्त नुकसान झालेला पक्ष हा नितीश कुमार यांचा जदयूच आहे. गेल्या वेळपेक्षा जदयूचे 28 सीट कमी झाले आहे आणि जदयू केवळ 43 सीटवर आली आहे. तसेच भाजप 21 जागांच्या फायद्यासह 74 जागांवर पोहोचली आहे. राजद सर्वात मोठा पक्ष बना आहे. त्यांना 75 सीट मिळाले आहेत. त्यांचे नेतृत्व करणाऱ्या महाआघाडीला 110 जागा मिळाल्या आहेत.
दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी नितीश कुमार यांना संघ आणि भाजपाची साथ सोडण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ट्विट करत नितीश कुमारांना तेजस्वी यादवला आशीर्वाद द्या असे म्हटले आहे. दिग्विजय सिंह यांनी बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर आज सकाळी एकापाठोपाठ एक ट्विट करत म्हणाले की, 'भाजप आणि संघ हे अमरवेलीप्रमाणे आहे. ते ज्या झाडाला विळखा घालतात. ते झाड वाळून जाते. त्यानंतर ती वेल त्यावर त्यावर कब्जा मिळवते. नितीशजी लालू प्रसाद यादव यांनी तुमच्यासोबत संघर्ष केला आहे. आंदोलनांमध्ये तुम्ही सोबतच तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे संघ आणि भाजपाच्या विचारधारेला सोडून देऊन तेजस्वी यांना आशीर्वाद द्या आणि अमरवेलीसारख्या असलेल्या भाजपा आणि संघाला बिहारमध्ये वाढण्यापासून रोखा.' असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले आहे.
भाजपा/संघ अमरबेल के समान हैं, जिस पेड़ पर लिपट जाती है वह पेड़ सूख जाता है और वह पनप जाती है।
— digvijaya singh (@digvijaya_28) November 11, 2020
नितीश जी, लालू जी ने आपके साथ संघर्ष किया है आंदोलनों मे जेल गए है भाजपा/संघ की विचारधारा को छोड़ कर तेजस्वी को आशीर्वाद दे दीजिए। इस “अमरबेल” रूपी भाजपा/संघ को बिहार में मत पनपाओ।
पुढे दिग्विजय सिंह म्हणाले की, 'नितीश जी, बिहार तुमच्यासाठी छोटे झाले आहे. तुम्ही भारताच्या राजकारणात या. सर्व समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणींवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांमध्ये ऐक्य आणण्यास मदत करा. इंग्रजांनी वाढवलेली 'फोडा, झोडा आणि राज्य करा' ही संघाने जोपासलेली नीती हाणून पाडण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन दिग्विजय सिंह यांनी केले.'
नितीश जी, बिहार आपके लिए छोटा हो गया है, आप भारत की राजनीति में आ जाएँ। सभी समाजवादी धर्मनिरपेक्ष विचारधारा में विश्वास रखने वाले लोगों को एकमत करने में मदद करते हुए संघ की अंग्रेजों के द्वारा पनपाई “फूट डालो और राज करो” की नीति ना पनपने दें। विचार ज़रूर करें।
— digvijaya singh (@digvijaya_28) November 11, 2020
तसेच दिग्विजय म्हणाले की, 'हीच महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांच्या प्रति खरी श्रद्धांजली ठरेल. तुम्ही त्यांच्याच वारशामधून समोर आलेले राजकारणी आहात आता तिथेच या. तुम्हाला आठवण करुन देऊ इच्छितो की, जनता पक्ष संघाच्या दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून फुटला होता. आता भाजप आणि संघाची साथ सोडा आणि देशाचा विनाश होण्यापासून वाचवा' असे दिग्विजय सिंह म्हणाले.
यही महात्मा गॉंधी जी व जयप्रकाश नारायण जी के प्रति सही श्रद्धांजलि होगी। आप उन्हीं की विरासत से निकले राजनेता हैं वहीं आ जाइए। आपको याद दिलाना चाहूँगा जनता पार्टी संघ की Dual Membership के आधार पर ही टूटी थी। भाजपा/संघ को छोड़िए। देश को बर्बादी से बचाइए।
— digvijaya singh (@digvijaya_28) November 11, 2020
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.