आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनवर काँग्रेसचे PM नरेंद्र मोदींना 7 प्रश्न:जयराम रमेश म्हणाले - पंतप्रधान मोदी देशाला विश्वासात का घेत नाहीत

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राहुल गांधी यांच्या विधानानंतर काँग्रेसने तवांग प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 7 प्रश्न विचारलेत. काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, सरकार चीनच्या मुद्यावर संसदेत चर्चा करण्यास का घाबरत आहे? PM मोदी देशाला विश्वासात का घेत नाहीत?

जयराम रमेश म्हणाले की, चीनच्या मुद्याशी संबंधित प्रश्नांवर देशाला विश्वासात घेणे ही पंतप्रधानांची जबाबदारी व कर्तव्य आहे. ते सोशल मीडियावर म्हणाले - मागील 100 दिवसांपासून भारतीय जनतेच्या वेदना, आशा व आकांक्षा ऐकत एका दिवसात 20-25 किलोमीटर चालणाऱ्या व्यक्तीवर भाजपचे लोक टीका करत आहेत. असे राजकारण थांबले पाहिजे. पंतप्रधानांनी चीनच्या मुद्यावर देशाला उत्तर दिले पाहिजे.

काँग्रेसचे 7 प्रश्न

  • 20 जून 2020 रोजी तुम्ही (पंतप्रधान) पूर्व लडाखमध्ये चीनने घुसखोरी केली नसल्याचा दावा का केला?
  • तुम्ही चीनला भारतीय सैनिक गत अनेक वर्षांपासून नियमित गस्त घालणाऱ्या प्रदेशात रोखण्याची परवानगी का दिली?
  • तुम्ही माउंटेन स्ट्राइक कोर स्थापन करण्याच्या 17 जुलै 2013 रोजी कॅबिनेटने मंजूर केलेल्या योजनेला पूर्णविराम का दिला?
  • तुम्ही चिनी कंपन्यांना पीएम केअर्स फंडात योगदान देण्याची परवानगी का दिली?
  • तुम्ही मागील 2 वर्षांपासून चीनमधून होणारी आयात विक्रमी पातळीपर्यंत का वाढू दिली?
  • सीमेवरील स्थिती व चीनमुळे उत्पन्न होणाऱ्या आव्हानांवर संसदेत चर्चा होऊ नये यावर तुम्ही का जोर देत आहात?
  • तुम्ही चीनच्या सर्वोच्च नेतृत्वासोबत 18 वेळा चर्चा केली आहे. नुकतेच शी जिनपिंग यांच्याशीही हस्तांदोलन केले आहे. त्यानंतर लगेचच चीनने तवांग सेक्टरमध्ये घुसखोरी करून सीमेवरील स्थिती एकतर्फी बदलण्याचा प्रयत्न केला. तुम्ही या प्रकरणी देशाला विश्वासात का घेत नाही?

काँग्रेसने विचारले - भाजपचा चीनसोबत संबंध काय

काँग्रेसने विचारले की, चीनच्या ब्लॅकलिस्टेड कंपन्यांना वारंवार का ठेका दिला जातो? तुमचे चीनशी कोणते नाते आहे? अखेरीस यामागे कोणते रहस्य आहे?

उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधत चीन युद्धाची तयारी करत असल्याचा व केंद्र सरकार झोपल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या विधानावर पलटवार करताना भाजपने गांधी कुटुंबावर निशाणा साधत राहुल यांचे विधान देशविरोधी असल्याचा दावा केला होता.

बातम्या आणखी आहेत...