आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भारत जोडो'च्या पोस्टरवर जळती खाकी चड्डी:संदेश -RSS च्या द्वेषातून 145 दिवसांत मुक्ती; संघ म्हणाला - त्यांच्या बापजाद्यांनीही हाच प्रयत्न केला

तिरुवनंतपुरम23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सातत्याने वादाच्या भोवऱ्यात आहे. केरळमधील त्यांच्या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 सप्टेबर रोजी काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) गणवेश असणाऱ्या खाकी चड्डीचे एक छायाचित्र शेअर केले. त्यात हा संदेश दिला - 'देशाला संघाच्या द्वेषातून मुक्त करण्यासाठी केवळ 145 दिवस शिल्लक राहिलेत.'

यावर संघाने जोरदार पलटवार केला आहे. ते म्हणाले - 'त्यांच्या बापजाद्यांनीही संघाचा खूप तिरस्कार केला. पण संघाची वाटचाल थांबली नाही.' दुसरीकडे, भाजपनेही या प्रकरणी काँग्रेसवर शिख विरोधी दंगलीला खतपाणी घालण्याचा आरोप केला आहे.

सर्वप्रथम जाणून घ्या, काँग्रेसच्या पोस्टमध्ये काय आहे...

काँग्रेसने 12 सप्टेबर रोजी भारत जोडो यात्रेच्या पाचव्या दिवशी हे पोस्टर ट्विट केले आहे.
काँग्रेसने 12 सप्टेबर रोजी भारत जोडो यात्रेच्या पाचव्या दिवशी हे पोस्टर ट्विट केले आहे.

काँग्रेसने शेअर केलेल्या फोटोत खाकी चड्डीचा एक कोपरा जळताना दिसून येत आहे. त्याखाली 145 दिवस शिल्लक असल्याचा संदेश आहे. काँग्रेसने या फोटोच्या कॅप्शनखाली लिहिले आहे - देशाला द्वेषाच्या जाळ्यातून मुक्त करण्यासाठी व भाजप-संघाने केलेले नुकसान भरून काढण्यासाठी आम्ही हळू-हळू आमच्या उद्दीष्टाकडे पोहोचत आहोत.

RSS ने म्हटले - काँग्रेसची लोकांना द्वेषातून जोडण्याचा प्रयत्न करत आहे

संघाच सह कार्यवाहक डॉ. मनमोहन वैद्य यांनी काँग्रेसच्या ट्विटला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले - 'ते लोकांना द्वेषातून जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या बापजाद्यांनीही संघाचा खूप तिरस्कार केला. आपल्या पूर्ण ताकदीने संघाला रोखण्याचा प्रयत्न केला. पण संघ थांबला नाही. त्याची सातत्याने वाढ होत आहे.'

संघाचे सह सरकार्यवाहक डॉ. मनमोहन वैद्य रायपूरमध्ये म्हणाले की, यापूर्वीही संघाला रोखण्याचा फार प्रयत्न झाला. पण संघ थांबला नाही.
संघाचे सह सरकार्यवाहक डॉ. मनमोहन वैद्य रायपूरमध्ये म्हणाले की, यापूर्वीही संघाला रोखण्याचा फार प्रयत्न झाला. पण संघ थांबला नाही.

भाजपचाही निशाणा

काँग्रेसच्या या ट्विटनंतर भाजप नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला. दक्षिण बंगळुरुचे भाजप खासदार तेजस्वी सूर्या, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा, दिल्ली भाजपचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांच्यासह अनेक नेत्यांनी काँग्रेस देश पेटवते हे मान्य केल्याची खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

तेजिंदर सिंग बग्गा यांनी एका ट्विटद्वारे काँग्रेसने 1984 मध्ये दिल्ली पेटवल्याचा आरोप केला आहे.
तेजिंदर सिंग बग्गा यांनी एका ट्विटद्वारे काँग्रेसने 1984 मध्ये दिल्ली पेटवल्याचा आरोप केला आहे.

तेजस्वी सूर्या म्हणाले - काँग्रेसने हिंसाचाराचे आवाहन केले

दक्षिण बंगळुरूचे भाजप खासदार तेजस्वी सूर्या म्हणाले की, 'काँग्रेसने 1984 साली दिल्ली पेटवली. काँग्रेसच्या इकोसिस्टमने 2002 मध्ये गोधरात कारसेवकांना जिवंत जाळले. आज पुन्हा एकदा त्यांनी हिंसाचाराचे आवाहन केले आहे. राहुल गांधी भारत सरकारविरोधात लढत आहेत. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस घटनात्मक पद्धतीवर विश्वास नसलेला पक्ष बनला आहे.'

आज काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा पाचवा दिवस

काँग्रेसने 7 सप्टेबर भारत जोडो यात्रा सुरू केली होती. 150 दिवसांच्या या यात्रेत काँग्रेस कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत प्रवास करणार आहे. तूर्त काँग्रेसने तामिळनाडूची यात्रा सुरू केली असून, सध्या केरळमध्ये यात्रेचा दुसरा दिवस आहे.

राहुल तामिळनाडूतील वादग्रस्त पादरींना भेटले होते

गोल वर्तुळातील पादरी जॉर्ज पोन्नैया यांनी यापूर्वी अनेकदा वादग्रस्त विधान केलेत.
गोल वर्तुळातील पादरी जॉर्ज पोन्नैया यांनी यापूर्वी अनेकदा वादग्रस्त विधान केलेत.

भारत जोडो यात्रेंतर्गत राहुल गांधी यांनी शुक्रवारी तामिळनाडूच्या कन्याकुमारीतील कॅथलिक धर्मगुरूंची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी जीजस क्राइस्ट ईश्वराचे रुप आहेत ना? असा प्रश्न केला होता. त्यावर तामिळ पादरी जॉर्ज पोन्नैया यांनी ईसा मसीहच खरे देव असल्याचे विधान केले होते.

राहुलची नजर 2024 वर, 150 दिवसांत 3500 किमी चालणार

काँग्रेसने 7 सप्टेबर 2022 पासून कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रेला सुरूवात केली. 12 राज्यांतील जवनळपास 3500 किमी अंतर कापणाऱ्या या यात्रेचे नेतृत्व स्वतः राहुल गांधी करत आहेत. भारतात अशी पदयात्रा काढण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.

1930 साली महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढून जगाला पदयात्रांची राजकीय शक्ती दाखवून दिली होती. तर 1990 मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रेच्या माध्यमातून भाजप भारतातील दुसरा मोठा पक्ष म्हणून नावारुपास आला होता.

बातम्या आणखी आहेत...