आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress Protest Against BJP | Congress On The Issue Of Inflation; Congress Leaders Along With Rahul, Priyanka Are Detained

हल्लाबोल:महागाईच्या मुद्यावर काँग्रेस रस्त्यावर; राहुल, प्रियंकांसह काँग्रेस नेते ताब्यात; काळ्या कपड्यांनी राम मंदिराला विरोध- शहा

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाई, बेराेजगारी, अन्नपदार्थांवरील जीएसटीच्या विराेधात काँग्रेसने शुक्रवारी देशव्यापी आंदाेलन केले. निदर्शनांत सामील नेत्यांनी काळ्या रंगाची वेशभूषा केली हाेती. राहुल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या खासदारांनी संसद भवनापासून राष्ट्रपती भवनपर्यंत मार्च काढला. वास्तविक पाेलिसांनी त्यांना मध्येच ताब्यात घेतले. काँग्रेस नेत्यांची सुमारे सहा तासांनंतर सुटका झाली. पाेलिसांनी नेते व खासदारांना मारहाण केल्याचा आराेप काँग्रेसने केला आहे. परंतु उलट काँग्रेस नेत्यांनीची लक्ष्य केल्याचा आराेप पाेलिसांनी केला. तत्पूर्वी राहुल गांधी म्हणाले, विराेध करणाऱ्यांच्या मागे तपास संस्था लावल्या जातात. ७० वर्षांत बनलेल्या लाेकशाहीला आठ वर्षांत संपवण्यात आले आहे. मी सत्य बाेलेन हीच माझी अडचण आहे. महागाई, बेराेजगारीचे मुद्दे मांडणार. भीती घालणारे लाेक या मुद्द्यांना घाबरतात. संसद किंवा बाहेर काेठेही बाेलू दिले जात नाही. तत्पूर्वी, काँग्रेेसने महागाई-बेराेजगारीच्या विराेधात शुक्रवारी निदर्शनांची घाेषणा केली हाेती. प्रियंका यांना काँग्रेस मुख्यालयाबाहेर अटक झाली. माेदीजींनी संपूर्ण देशाची संपत्ती विकली आहे. त्यांच्याकडे (मंत्री) मुबलक पैसा असल्याने त्यांना महागाई दिसत नाही.

काँग्रेसच्या आंदोलनाचा केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी समाचार घेतला. ईडीने आज तर काेणाची चौकशी केलेली नाही. मग काँग्रेस नेते शुक्रवार काळे कपडे परिधान करून का निदर्शने करत होते? काँग्रेस लांगुलचालनाचे राजकारण करत आहे. काँग्रेसने विरोध करण्यासाठी हा दिवस निवडला. काळे कपडेही परिधान केले. कारण काँग्रेसला लांगुलचालनाच्या राजकारणाला आणखी प्रोत्साहन देण्याची इच्छा आहे. त्याशिवाय त्यांना एक संदेशही द्यायचा आहे. याच दिवशी (५ ऑगस्टला) पंतप्रधानांनी रामजन्मभूमीची पायाभरणी केली होती. त्याच दिवशी गेल्या दोन वर्षांपासून काँग्रेस निदर्शने करत आहे.

ईडीला घाबरवण्याचे प्रयत्न : रविशंकर प्रसाद : त्यावर माजी केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते रविशंकर प्रसाद म्हणाले, त्यांना वेळ दिला जात नाही, असे राहुल गांधी बाेलले. परंतु ते खाेटे बाेलले आहेत. सभागृहात महागाईवर चर्चा झाली. तेव्हा काँग्रेसचे लाेक पळून गेले की नाही? महागाई व बेराेजगारी तर बहाणा आहे. मूळ कारण ईडीला घाबरवणे, धमकावणे आणि परिवाराला वाचवणे असे आहे.

बातम्या आणखी आहेत...