आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांना म्हटले 'अडाणी':काँग्रेसने देशात शाळा बनवल्या, मात्र तरीही नरेंद्र मोदी 'अडाणीच', ट्विट डिलीट करत काँग्रेसने मागितली माफी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाविरोधात काँग्रेसकडून अपशब्द वापरण्यात आले आहे. कर्नाटक काँग्रेसच्या ऑफिशियल ट्विटर खात्यावरून पंतप्रधानांचे उल्लेख 'अंगठा छाप आणि अडाणी' असे करण्यात आले आहे. त्यानंतर काही तासातच पुन्हा हे ट्विटर डिलीट करण्यात आले आहे. कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांनी या घटनेबद्दल माफी मागितली आहे. 'सोशल मीडिया मॅनेजरकडून चुकून हा ट्विट झाल्यानंतर आम्ही हे ट्विट मागे घेत आहोत.' असे शिवकुमार यांनी म्हटले आहे.

ट्विटमध्ये नेमके काय
कर्नाटक काँग्रेसच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करण्यात आले होते की, 'काँग्रेसने देशात शाळा बनवल्या, मात्र मोदी त्या शाळांमध्ये कधी गेलेच नाही. काँग्रेसने जेष्ठ नागरिकांना देखील शिक्षित करण्यासाठी अनेक योजना आणल्या मात्र पंतप्रधानानी या योजनेत सहभाग कधीच सहभाग नोंदवला नाही. पंतप्रधान मोदी हे अडाणी असून, त्यांच्यामुळे देशातील नागरिकांना भीक मागण्याची वेळ आली आहे.' असे ट्विट काँग्रेसकडून करण्यात आले होते.

भाजपची प्रतिक्रिया
काँग्रेसच्या या ट्विटवरून भाजपने आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे प्रवक्ता मालविका अविनाश यांनी म्हटले आहे की, 'काँग्रेसने त्याची मर्यादा ओलांडली आहे. पंतप्रधानांबद्दल असे शब्द वापरणे त्यांना योग्य वाटते का?' अशी प्रतिक्रिया भाजपने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...