आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक:​​खरगे म्हणाले- थरूर भावाप्रमाणे असून ही निवडणूक कौटुंबिक; थरूर म्हणाले- उमेदवारांत चर्चा झाली पाहिजे

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभा खासदार शशी थरूर यांच्यात लढत होणार आहे. निवडणूक प्रचाराची सुरुवात करताना खरगे यांनी रविवारी प्रसारमाध्यमांना सांगितले की, मी शरी थरूर यांना सांगितले होते की, अध्यक्षपदासाठी सर्वसहमतीचा उमेदवार असता तर बरे झाले असते. परंतू शरी थरूर यांनी त्यांचे ऐकले नाही.

खरगे पुढे बोलताना म्हणाले की, नामांकनानंतर मी स्वतः थरूर यांना फोनवर सांगितले होते. यावेळी थरूर मला म्हणाले की, लोकशाहीत स्पर्धा असली पाहिजे. जर खरच कोणी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत असेल तर तुम्ही त्याला कसे रोखू शकता? थरूर हे माझे धाकटे भाऊ आहेत. हा कौटुंबिक प्रश्न आहे. हे काही G-23 शिबीर नाही. दरम्यान, अध्यक्षपदासाठी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर आहे. 17 ऑक्टोबर रोजी निवडणूक होईल आणि 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल.

सुमारे महिनाभरापूर्वी मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधी यांच्यावर अध्यक्ष होण्यासाठी आग्रह करणार असल्याचे सांगितले होते. आता खरगे हे स्वतः अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार आहेत.
सुमारे महिनाभरापूर्वी मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधी यांच्यावर अध्यक्ष होण्यासाठी आग्रह करणार असल्याचे सांगितले होते. आता खरगे हे स्वतः अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार आहेत.

खरगे म्हणाले - अध्यक्ष होण्याबाबत गांधी परिवाराशी चर्चा करणार
अध्यक्ष होण्याबाबत गांधी परिवार आणि वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करणार असल्याचे खरगे यांनी सांगितले. त्याचवेळी भाजपने निवडणुकीत फसवणूक केल्याचा आणि खरा ताबा गांधी घराण्याकडे ठेवल्याचा आरोप केला. याला देखील उत्तर देताना खरगे म्हणाले की, भाजपमध्ये कधी निवडणुका झाल्या आहेत का? जे.पी. नड्डा यांची निवड कोणी केली आहे?

शरी थरूर म्हणाले- लोकांना उमेदवारांमधील डिबेट पाहायची आहे

शशी थरूर म्हणाले की, उमेदवारांमध्ये सार्वजनिक चर्चा व्हायला हवी. लोकांना असा वाद-विवाद पहायचा आहे. त्यासाठी मी देखील तयार आहेत. ब्रिटनमधील कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतृत्वपदाच्या निवडणुकीत जशी डिबेट झाली होती. तशीच लोकांमध्ये पक्षाबद्दलची आवड निर्माण होईल. काँग्रेस पक्षातील सदस्यांच्या हृदयात नेहरू-गांधी परिवाराचे नेहमीच विशेष स्थान होते आणि कायम राहणार आहे.

राजस्थान मुख्यमंत्र्यांबाबत हायकमांडच्या निर्णयाची प्रतीक्षा

राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. मात्र, दिल्लीहून परतल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत सातत्याने अशी विधाने करत आहेत, जेणेकरून बदलाचे वारे थंडावले असल्याचा संदेश आमदारांमध्ये जावा.

रविवारी गेहलोत यांनी पायलट गटावर हल्ला चढवला आणि म्हणाले - मुख्यमंत्री जेव्हा सोडू लागतात तेव्हा 80-90% आमदार त्यांना सोडून जातात. कारण पदावर जो कोणी नवीन व्यक्ती येणार आहे. ती व्यक्ती आमदारांना मंत्री बनवणार असते. तर त्यांचे कामे करणार असते. मात्र, राजस्थानमध्ये हा प्रकार झाला नाही. मी कॉंग्रेस अध्यक्ष होणार आणि राजस्थानला नवीन मुख्यमंत्री मिळणार असे आमदारांना वाटताच 102 आमदार संतप्त झाले. सर्वजण माझ्या पाठीशी उभे राहीले. त्यांनी असा निर्णय का घेतला, याचे संशोधन करण्याची गरज आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शशी थरूर यांनी जाहीरनाम्याचे मुखपृष्ठ प्रसिद्ध केले.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शशी थरूर यांनी जाहीरनाम्याचे मुखपृष्ठ प्रसिद्ध केले.
बातम्या आणखी आहेत...