आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress President Election | Sonia Gandhi, Rahul Gandhi, Congress President, Congress President Election On June 23, Congress Defeat In Assembly Election; News And Live Updates

अध्यक्षीय निवडणुकीवर कॉंग्रेसमध्ये नाही एकमत:CWC च्या बैठकीत नेत्याच्या निवडणुकीवर चर्चा; परंतु गहलोत, आझाद आणि आनंद शर्मा म्हणाले - कोरोनामुळे याची गरज नाही

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2019 मध्ये राहुल यांचा राजीनामा, सोनिया कार्यकारी अध्यक्षपदी

कॉंग्रेसचे नवीन अध्यक्ष निवडण्यावरुन कॉंग्रेस वर्किंग कमिटीमध्ये (सीडब्ल्यूसी) एकमत नसल्याचे दिसून येत आहे. सोमवारी झालेल्या सीडब्ल्यूसीच्या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मुद्दयावर चर्चा झाली. या दरम्यान अशोक गहलोत, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा या ज्येष्ठ नेत्यांनी निवडणुकीला विरोध केला आहे. कारण कोरोना महामारीच्या काळात या निवडणुका घेण्याची गरज नसल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे.

यापूर्वी काही अहवालांमध्ये सीडब्ल्यूसीच्या बैठकीत निवडणुकीची तारीख निश्चित केली गेली असून 23 जून रोजी नेत्याची निवड होईल असा दावा करण्यात आला होता. परंतु, न्यूज एजन्सी पीटीआयने सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधला असून त्या बैठकीत फक्त निवडणुकांवर चर्चा झाल्याचे सोनिया यांनी म्हटले आहे.

2019 मध्ये राहुल यांचा राजीनामा, सोनिया कार्यकारी अध्यक्षपदी
2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या जोरदार पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांनी कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारली होती. तेव्हापासून कॉंग्रेस नेत्यांचा एक गट पूर्णवेळ व सक्रिय अध्यक्षाच्या निवडणुकीची मागणी करत होता. तर दुसरीकडे गांधी परिवारातून सतत स्वतंत्र अध्यक्ष करण्याची मागणीही होत आहे.

काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहले होते पत्र
संबंधित प्रकरणात काँग्रेस पक्षातील तब्बल 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून वरपासून खालपर्यंत बदल करण्याची मागणी केली होती. त्यात कपिल सिब्बल, गुलाब नबी आझाद यासारख्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश होता. सोनिया यांना लिहलेल्या पत्रात काँग्रेसला पूर्णवेळ नेतृत्त्वाची गरज असल्याचे सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...