आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress President Kharge On PM Modi, Ahmadabad Congress Rally Updates, Gujrat Assembly Elections 2022

खरगेंनी PM मोदींना दिली रावणाची उपमा:म्हणाले- आमदार, खासदारकीच्या निवडणुकीत तुमचा चेहरा पाहिला; रावणासारखी 100 तोंडे आहेत का?

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचारात काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वक्तव्य केले आहे. सोमवारी अहमदाबादमध्ये जाहीर सभेत खरगे म्हणाले की, मोदींची रावणासारखी 100 तोंडे आहेत का? मला कळत नाही. रविवारी सुरतमधील जाहीर सभेत खरगे यांनी स्वत:ला अस्पृश्य म्हटले आणि पंतप्रधान मोदी हे खोटे बोलणारे नेते ठरवले होते.

काय म्हणाले खरगे?

बेहरामपुरा येथील जाहीर सभेत खरगे म्हणाले – पंतप्रधान म्हणतात इतरत्र पाहू नका. मोदींना पाहून मतदान करा. मी तुमचा चेहरा किती वेळा पाहतो? महापालिका निवडणुकीत तुमचा चेहरा आम्ही पाहिला. आमदारकीच्या निवडणुकीत, खासदारकीच्या निवडणुकीत पाहिला. सगळीकडे रावणाचे 100 तोंडे आहेत का? मला कळत नाही.

भाजपने म्हटले- खरगे निवडणुकीचा दबाव सहन करू शकत नाहीत

भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी मंगळवारी म्हटले की, गुजरात विधानसभा निवडणुकीचा दबाव खरगे सहन करू शकले नाहीत. प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, काँग्रेसने तेच केले, ज्यात ते पारंगत आहेत. ते पुन्हा एका व्यक्तीला शिवीगाळ करत आहेत. काँग्रेसनेही पंतप्रधानपदाचा अनादर करण्यास सुरुवात केली आहे. खरगे यांचे विधान हा योगायोग नसून ते व्होट बँकेसाठी आहे. एक चायवाला पंतप्रधान झाला हे त्यांना मान्य नाही.

सुरतमध्ये म्हणाले- आम्ही अस्पृश्य आहोत, तुमचा चहा तरी पितात, पण आमचा...

सुरतच्या सभेत खरगे जे काही बोलले, ते जसेच्या तसे येथे मांडत आहोत. खरगे म्हणाले होते, "तुमच्यासारखा माणूस, जो नेहमी दावा करतो की, मी गरीब आहे. अरे भाऊ, आम्हीही गरीबच आहोत. आम्ही गरिबांतील गरीब आहोत. आम्ही अस्पृश्यांमध्ये येतो. तुमचा चहा तरी कुणी पितो, आमचा तरी कुणीही पीत नाही. आणि मग तुम्ही म्हणता- मी गरीब आहे. मला कोणी शिवी दिली, माझी औकादच काय आहे."

बातम्या आणखी आहेत...