आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरगे यांचा राज्यसभा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा:काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आता थरूर आणि खरगे, केएन त्रिपाठी यांचा फॉर्म रद्द

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शनिवारी सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. वास्तविक काँग्रेसमध्ये 'एक व्यक्ती एक पद' हे तत्त्व आहे. त्यानुसार खरगे यांनी राजीनामा दिला. आता त्यांच्या जागी पी. चिदंबरम किंवा दिग्विजय सिंह राज्यसभेत येऊ शकतात, असे मानले जात आहे.

30 सप्टेंबर रोजी एकूण 20 फॉर्म जमा करण्यात आले होते. यापैकी 4 फॉर्म हे छाननी समितीने नाकारले आहेत. केएन त्रिपाठी यांचा फॉर्म विहित निकषांची पूर्तता करत नसल्याने नाकारण्यात आला. आता काँग्रेस अध्यक्षपदासाठी सध्याचे दोन दावेदार मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांचा समावेश आहे. अर्ज मागे घेण्यासाठी 8 ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे, त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. कोणीही नावे मागे न घेतल्यास मतदान प्रक्रिया सुरू होईल, असे काँग्रेस केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले.

खरगे 2021 मध्ये झाले होते विरोधी पक्षनेते

काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर 2021 मध्ये गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये खरगे यांना राज्यसभेत विरोधी पक्षनेते बनवण्यात आले होते. खरगे यांच्या प्रवेशानंतर दिग्विजय यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून स्वतः बाहेर पडले. पक्ष आणि हायकमांडच्या विश्वासू नेत्यांपैकी ते एक असून विरोधी पक्षनेतेपदासाठी त्यांची पहिली पसंती असल्याचे बोलले जात आहे.

एक व्यक्ती एक पद हे तत्व काय आहे
एक व्यक्ती एक पद या तत्त्वानुसार काँग्रेस पक्षाचा कोणताही नेता एकाच वेळी दोन पदे भूषवू शकत नाही. या तत्त्वानुसार, पक्षाला संघटनेतील प्रत्येक स्तरावर 50 टक्के पदांवर 50 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या तरुण चेहऱ्यांना संधी द्यायची आहे.

या अंतर्गत कोणतीही व्यक्ती 5 वर्षांपेक्षा जास्त काळ पक्षाचे पद भूषवू शकत नाही. कार्यकाळ संपल्यानंतर त्या व्यक्तीला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही पदावर परत यायचे असेल तर त्याला 3 वर्षांच्या कालावधीनंतरच संधी दिली जाईल.

या वर्षी मे महिन्यात राजस्थानमधील उदयपूर येथे काँग्रेसच्या चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 430 नेत्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विजयाचा रोड मॅप तयार केला होता. यादरम्यान पक्षात अनेक मोठे बदल झाले. यामध्ये 'एक व्यक्ती एक पद' हे तत्वही पारित करण्यात आले.

सिद्धांतावर गदारोळ

काँग्रेस अध्यक्षपदासाठी पक्षाने 22 सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी केली होती. नोटीस जारी झाल्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींना भेटण्यासाठी कोचीला पोहोचले. यापूर्वी अशोक यांनी आपल्या एका निवेदनात म्हटले होते की, पक्षाच्या फायद्यासाठी ते दोन पदांवर कायम राहू शकतात. पण एक व्यक्ती एक पद या तत्त्वावर पक्ष चालेल, असे राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितल्याने त्यांच्या हेतूला तडा गेला.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक 17 ऑक्टोबरला

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना 22 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आली होती. 24 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली, ती 30 पर्यंत चालली. 8 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर होईल.

बातम्या आणखी आहेत...