आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ईडीसमोर हजर होण्यास वेळ मागितला

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नॅशनल हेराॅल्डशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात हजर होण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाकडे(ईडी) आणखी वेळ मागितला आहे. गांधी यांच्या वतीने सांगितले की, त्या कोरोना विषाणू संसर्गित असून अद्याप बऱ्या झाल्या नाहीत. सूत्रांनी सांगितले की, सोनिया यांना गेल्या गुरुवारी कोरोना संसर्ग झाला होता. आतापर्यंतच्या तपासणीत अहवाल निगेटिव्ह आला नाही. ईडीने सोनियांना ८ जूनला बोलावले आहे. या प्रकरणात ईडीने राहुल गांधींनाही १३ जून रोजी बोलावले आहे. त्याआधी ईडीने राहुल यांना २ जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...