आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅप्टनचा दावा:राजीनाम्यानंतर काँग्रेस अध्यक्षा म्हणाल्या 'सॉरी अमरिंदर'; प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्र्यांचा दावा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोण घेणार कॅप्टनची जागा?

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काल राज्यपालाकडे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पंजाब राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. राज्यातील काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत संघर्षामुळे पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, पक्षश्रेष्ठींनी आपल्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित केल्याने आपल्याला आपण राजीनामा दिल्याचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग म्हणाले.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या राजीनाम्याची खापर काँग्रेसचे पंजाब प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर फोडली आहे. राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मला फोन करुन सॉरी म्हणाल्या असा दावा देखील अमरिंदर सिंग यांनी केला आहे. कॅप्टनने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा दावा केला आहे.

काय म्हणाले कॅप्टन?
पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, 'सोनिया गांधी यांनी मला सकाळी फोन केला. परंतु, मी त्यांचा फोन उचलू शकलो नाही. परत मी त्यांना फोन केला असता हे सगळं काय चाललयं याबाबत विचारणा केली आणि अशा परिस्थितीत मी राजीनामा देणं योग्य आहे असं त्यांना सांगितलं. त्यावर सोनिया गांधी ठीक आहे, द्या तुम्ही राजीनामा असं म्हणत सॉरी अमरिंदर' असं म्हणाल्या असा दावा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केला आहे.

कोण घेणार कॅप्टनची जागा?

  • कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर खुर्ची सोडण्याची वेळ आल्यास पुढील मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न निर्माण होतो. काँग्रेस बंडखोर आमदारांपैकी एक गट सुखजिंदर रंधावा यांना सीएम करू इच्छित आहे. पण, तसे झाल्यास कॅप्टन गट नाराज होऊ शकतो.
  • यासोबतच सोशल मीडियावरून नवज्योत सिंग सिद्धू यांना सीएम करण्यासाठी कॅम्पेन चालवले जात आहेत. पण, त्यांना प्रदेशाध्यक्ष केल्यानंतरच काँग्रेसमध्ये फुटीची परिस्थिती निर्माण झाली. अशात सिद्धूंना सीएम पद देऊन पक्ष धोका पत्करणार का? असा प्रश्न आहे.
  • पंजाबमध्ये सध्या मुख्यमंत्री कॅप्टन आणि प्रदेशाध्यक्ष सिद्धू हेच शिख चेहरे आहेत. यामुळे, पंजाबमध्ये काँग्रेसला हिंदू आणि शिख मतांमध्ये ताळमेळ बसवणे कठीण जात आहे. पुढील 5 महिन्यांचा मुख्यमंत्री म्हणून सुनिल जाखड यांचेही नाव चर्चेत आहे.
  • माजी प्रदेशाध्यक्ष लाल सिंग, खासदार प्रताप सिंह बाजवा, राजिंदर कौर भट्ट्‌ल हे देखील सीएम पदाच्या शर्यतीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...