आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress Put Up A QR Code Poster Of Chief Minister Bommai's Face, A Strong Attack On BJP

कर्नाटकचे नाटक:काँग्रेसने मुख्यमंत्री बोम्मईंच्या  चेहऱ्याचे लावले क्यूआर कोड पोस्टर, भाजपवर जोरदार हल्ला

विनय माधव | बंगळुरू15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक विधानसभा निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. त्याच्या आधी भाजप व काँग्रेस परस्परांना भ्रष्टाचार ठरवण्यासाठी कुरघोडी करू लागले आहेत. काँग्रेसने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची अनेक पोस्टर चिकटवली आहेत. परंतु त्यावर क्यूआर कोड लावलेला आहे. त्याला स्कॅन केल्यावर काँग्रेसचे संकेतस्थळ सुरू होते. त्याचे नाव ‘४० टक्के सरकार’ असे ठेवलेले आहे. म्हणजे भाजपच्या सत्ता काळात कशा प्रकारे ४० टक्के कमिशनची संस्कृती वाढली होती, हे त्याद्वारे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संकेतस्थळावर लोक सरकारमधील भ्रष्टाचाराची तक्रारही करू शकतात. कर्नाटकच्या कंत्राटदारांनी एक दावा केला आहे. सरकारी कंत्राटामध्ये भाजप नेते व अधिकारी ४० टक्के कमिशन घेतात, असा त्यांचा आरोप आहे. कंत्राटदारांनी या प्रश्नावर पंतप्रधानांकडे तक्रार केली आहे. काँग्रेसने पीएसआय भरती घोटाळाही मांडला आहे. भाजपनेही काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उजेडात आणून प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. सिद्धरमय्या यांच्या कार्यकाळात २०१७ मध्ये शालेय शिक्षक भरतीत घोटाळा झाला होता, असा आरोप भाजपने केला आहे. सीआयडीने याप्रकरणी सात जणांना अटक केली.

जेडीएसची मनधरणी : भाजप व काँग्रेस जनता दल सेक्युलर या पक्षाला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडे एच.डी. देवेगौडा यांची प्रकृती बिघडल्यामुळे काँग्रेस तसेच भाजपच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. पण कुमारस्वामी नाराज आहेत.

बातम्या आणखी आहेत...