आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Congress Re constitutes The Congress Working Committee (CWC) And Its Central Election Authority

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लेटर बॉम्बनंतर काँग्रेसमध्ये मोठे बदल:राहुल यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा, सोनियांना पत्र लिहणाऱ्या गुलाम नबी आझाद यांना सरचिटणीसपदावरून हटवले

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 7 ऑगस्टला लिहिलेल्या पत्रात 'फुल टाइम लीडरशिप'ची मागणी केली होती

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींनी शुक्रवारी पक्षाच्या कार्यकारी समितीत मोठे बदल केले. गुलाम नबी आझाद, मोतीलाल वोरा, अंबिका सोनी, मल्लिकार्जुन खर्गे आणि लुइजिन्हो फालेरिओ यांना सरचिटणीस पदावरून काढून टाकण्यात आले आहे. यापैकी गुलाम नबी आझाद सोनिया यांना पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांपैकी एक होते.

राहुल गांधींच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा करण्यासाठी हे बदल करण्यात आल्याचे मानले जाते, कारण पत्र लिहिणाऱ्या नेत्यांना पक्षाच्या नेतृत्वात बदल हवा होता. 7 ऑगस्ट रोजी लिहिलेल्या पत्रामध्ये जो 'क्षेत्रात सक्रिय राहील आणि त्याचा प्रभाव दिसेल' अशा पूर्णवेळ नेतृत्वाची मागणी केली होती.

काँग्रेसमधील सूत्रांचे म्हणणे आहे की, पूर्णवेळ नेतृत्व आणि क्षेत्रातील सक्रियता यासारख्या शब्दांचा वापर या संदर्भात होता की काँग्रेसच्या एका पक्षाला पुन्हा राहुल गांधींचे नेतृत्व नको आहे. या लेटर बॉम्बनंतर आता सोनिया गांधी यांनी संघटनेत मोठे बदल केले आहेत.

आझाद यांना सर्वात मोठा धक्का

सर्वात मोठा धक्का गुलाम नबी आझाद यांना बसला आहे. सध्या ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. मागील सीडब्ल्यूसीच्या बैठकीत गुलाम नबी हे राहुल गांधींच्या कथित विधानाला विरोध करणार्‍यांमध्ये आघाडीवर होते. आता पुन्हा त्यांना राज्यसभेचे तिकीट मिळणेही अवघड असल्याचे मानले जात आहे.

सोनिया यांना पाठिंबा देणार्‍या सुकाणू समितीत 6 नेते, अनुभवला पसंती

पक्षात नेतृत्व बदलण्यासाठी समिती स्थापन करण्याची सूचना सोनिया यांनी केली होती. या आधारावर 6 लोकांनी एक समिती स्थापन करण्यात आली. याला संचालन समिती म्हटले जात आहे. आता ही समिती राहुल गांधींची अध्यक्षपदी निवड आणि पक्ष संघटनेत नवीन बदल करण्याचा मार्ग मोकळा करेल, असे मानले जात आहे. या समितीत माजी संरक्षणमंत्री एके अँटनी, सोनिया गांधी यांचे सर्वात विश्वासू अहमद पटेल, संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि मुकुल वासनिक यांचा समावेश केला आहे. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना सर्वात मोठी पदोन्नती मिळाली आहे. त्यांनाही या समितीत समाविष्ट करण्यात आले आहे. वयामुळे सरचिटणीसपदावरून हटविण्यात आलेल्या अंबिका सोनी यांना या समितीत स्थान मिळाले आहे.

वयामुळे या 4 नेत्यांना हटवले

मोतीलाल वोरा : गांधी घराण्यातील ते सर्वात विश्वासू नेत्यांपैकी एक आहेत. बर्‍याच काळापासून पक्षाचे कोषाध्यक्ष आहेत. आता ते 92 वर्षांचे आहेत.

अंबिका सोनी : केंद्रीय मंत्री राहिल्या. सोनिया गांधींच्या विश्वासू होत्या. आता त्या 77 वर्षांच्या आहे.

मल्लिकार्जुन खर्गे : गेल्या लोकसभेत ते काँग्रेसचे नेते होते. 2019 मध्ये निवडणुकीत पराभूत. आता 78 वर्षांचे आहेत.

लुईझिनहो फालेरोः गोव्याचे माजी मुख्यमंत्री होते. आता ते 69 वर्षांचे आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser