आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Karnataka | Congress Rahul Gandhi Congress | BJP In Karnataka: Rahul | Marathi News

राजकीय हालचाली वाढल्या:कर्नाटकमध्ये भाजपला पराभूत करण्यास काँग्रेस सज्ज; सत्तेवर आल्यास प्रामाणिक सरकार देणार

बंगळुरू16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकात भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस एकजुटीने तयार आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डी.के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात समेट झाल्याने राहुल यांनी आनंद व्यक्त केला आहे. सिद्धरामय्या यांच्या ७५ व्या जन्मदिनानिमित्त कर्नाटकात राजकीय हालचाली वाढल्याचे दिसून आले.

शिवकुमार यांनी सिद्धरामय्यांचे अभीष्टचिंतनही केले. राहुल पुढे म्हणाले, मला आज खूप आनंद वाटताे. सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी परस्परांची गळाभेट घेतली. शिवकुमार यांनी कर्नाटकातील काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीसाठी माेठे याेगदान दिले आहे. पुढील वर्षी हाेणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस एकजुटीने भाजपला पराभूत करेल. काँग्रेस सरकार सत्तेवर येईल तेव्हा स्वच्छ व प्रामाणिक सरकार देईल. काँग्रेस सरकार राज्याच्या भविष्यासाठी झटेल.

काँग्रेसच्या सरकारमध्ये द्वेषाला थारा नसेल. राज्यातील तीन हत्यांचा संदर्भ देत “अशा प्रकारचा हिंसाचार हाेणार नाही,’ अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.आगामी निवडणुकीत शिवकुमार व सिद्धरामय्या काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार मानले जातात. दाेन्ही गटांकडून आपल्या नेत्याच्या उमेदवारीसाठी आतापासूनच माेर्चेबांधणी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...