आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress Sets Up Tents Outside Strong Room To Monitor EVMs Latest News And Update

मतमोजणीपूर्वी EVMच्या सुरक्षेवर सवाल:हिमाचलमध्ये काँग्रेसचे स्ट्राँग-रूमबाहेर तंबू, नेते 24 तास स्वतः ठेवत आहेत नजर

शिमला10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्मपूर महाविद्यालयातील स्ट्राँग रूमबाहेर डेरा टाकलेले काँग्रेस नेते.  - Divya Marathi
धर्मपूर महाविद्यालयातील स्ट्राँग रूमबाहेर डेरा टाकलेले काँग्रेस नेते. 

हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी EVM अर्थात मतदान यंत्राच्या सुरक्षेवर चर्चा रंगली आहे. काँग्रेसने अर्धा डझनहून अधिक विधानसभा क्षेत्रांत स्थापन करण्यात आलेल्या स्ट्राँग रूमबाहेर तंबू गाडलेत. काँग्रेस नेते 24 तास या स्ट्राँग रूमबाहेर डेरा टाकून ईव्हीएमची सुरक्षा करत आहेत.

काँग्रेस उपाध्यक्ष नरेश चौहान यांनी सांगितले की, पक्षाने धर्मपूर, किन्नौर, पांवटा साहब, घुमारवी, नाचन व गगरेटमध्ये तंबू टाकलेत. सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांनी शंका व्यक्त केल्यामुळे असे करण्यात आले आहे. रामपूरमध्य खासगी गाडीत ईव्हीएम आढळल्यामुळे हा संशय अधिक गडद झाला आहे.

पक्षाचे नेते 24 तास स्ट्राँग रूमची निगराणी करत आहेत. कोण स्ट्राँग रूममध्ये ये-जा करत आहे यावर करडी नजर ठेवली जात आहे. निवडणूक आयोगामुळे तंबू ठोकण्याची वेळ ओढावली आहे. आयोगाने या प्रकरणी सुरक्षेची कोणती व्यवस्था केली हे सांगावे, असे चौहान म्हणाले.

थ्री-लेयर सुरक्षेचे दावे केले जात आहेत. पण ही सुरक्षा किती फुल-प्रुफ आहे हे आयोगाने सांगावे. देशातील अनेक राज्यांत ईव्हीएमविषयी वेळोवेळी चर्चा होते. यामुळेही संशयाला जागा आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या प्रकरणी लोकांचा विश्वास जिंकण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

धर्मपूरमध्ये तंबू ठोकून स्ट्राँग रूमची सुरक्षा करताना काँग्रेस नेते.
धर्मपूरमध्ये तंबू ठोकून स्ट्राँग रूमची सुरक्षा करताना काँग्रेस नेते.

CCTV द्वारेही स्ट्राँग रूमची देखरेख -चंद्रशेखर

धर्मपूरचे काँग्रेस उमेदवार चंद्रशेखर यांनी सांगितले की, जनतेला ईव्हीएमशी छेडछाड केली जाईल अशी शंका आहे. त्यामुळे जनतेनेच धर्मपूर महाविद्यालयातील स्ट्राँग रूमबाहेर तंबू ठोकलेत. घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावूनही सुरक्षा केली जात आहे. आमचा असा करण्याचा विचार नव्हता. पण त्यांच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे आम्हाला तंबू ठोकावे लागलेत.

सर्वच विधानसभा क्षेत्रांत स्ट्राँग रूम

हिमाचल प्रदेशातील सर्वच विधानसभा क्षेत्रांत स्ट्राँग रूम स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यात ईव्हीअम सील करून ठेवण्यात आल्यात. मतदानाच्या दिवशी रामपूरमध्ये एक ईव्हीएम खासगी वाहनात आढळली. त्यामुळे काँग्रेसने तिच्याशी छेडछाड झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

8 डिसेंबर रोजी होणार मतमोजणी

राज्यात 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. म्हणजे अद्याप 18 दिवसांचा अवकाश आहे. त्यामुळे साहजिकच काँग्रेस नेते 8 डिसेंबरपर्यंत स्ट्राँग रूमबाहेर डेरा टाकणार आहेत. दुसरीकडे, निवडणूक आयोगाने सर्वच ईव्हीएमची कडेकोड सुरक्षा केली जात असल्याचा दावा केला आहे. तसेच ईव्हीएममध्ये छेडछाड होण्याची शक्यता नसल्याचे नमूद करत स्ट्राँग रूमच्या आत व बाहेर सीसीटीव्ही लावून निगराणी केली जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

पराभवामुळे काँग्रेस निराश -गणेश

दुसरीकडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष गणेश दत्त म्हणाले की, काँग्रेस निवडणुकीच्या निकालामुळे घाबरली आहे. काँग्रेसवर निवडणूक आयोगच नव्हे तर सरकारच्या व्यवस्थेवरही विश्वास नाही. त्यामुळे ते आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...