आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवा राजकारण:काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीत ओतला पैसा,  विशेष विमानाने पैशांने भरलेल्या बॅगा घेऊन आले होते गोव्यात, देवेंद्र फडणवीसांचा गौफ्यस्फोट

पणजी7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपने निवडणुकीत पैसा ओतला असे म्हटले जाते ते चुकीचे आहे. उलट काँग्रेसच्या नेत्यांनी पैशांने भरलेल्या बॅगा घेऊन विशेष विमानाने गोवा गाठले. निवडणुकीत पैसा ओतला, पण त्यांचा पराजय झाला. काँग्रेसने या निवडणुकीत मोठा खर्च केला असा गौप्यस्फोट महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

आम्ही उत्तम काम करतो हे यश टिम देवेंद्रचे नसून टिम मोदींचे आहे असेही ते म्हणाले. गोव्यातील विजयानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले, गोव्याचा चेहरा बदलला. लोकांनी विकास अनुभवला. महिलांचे प्रचंड मतदान भाजपला मिळाले. गोवा सरकार व केंद्राने येथे काम केल्याची ही पावती आहे. अल्पसंख्यांकांच्या बाबतीत नेरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला. पण अल्पसंख्यांक समाजाने आम्हाला गोव्यात भरभरून मतदान केले या कृतीतून हा आरोप जनतेनेच खोडून काढला असेही ते म्हणाले.

भाजपने गोवा निवडणुकीत पैसा ओतला असे म्हटले जाते ते चुकीचे आहे. उलट काँग्रेसच्या नेत्यांनी पैशांने भरलेल्या बॅगा घेऊन विशेष विमानाने गोवा गाठले व येथे पैसा ओतला पण त्यांचा पराजय झाला. काँग्रेसने या निवडणुकीत खर्च केला. आम्ही उत्तम काम करतो हे यश टिम देवेंद्रचे नसून टिम मोदींचे आहे असेही ते म्हणाले.

विजयाचा महाराष्ट्रावर परिणाम
गोव्यातील विजय हा महत्वपुर्ण आहे. लगतच असलेल्या महाराष्ट्र राज्यावर याचा परिणाम होणार आहे. विजयामुळे नेते, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढते. भाजपवरील जनतेचा विश्वास वाढतो. जनता व कार्यकर्त्यांचे नैतिक पाठबळ वाढते असेही ते म्हणाले.

उत्त्पल पर्रिकरांच्या पराभवाचे दुःख
उत्त्पल पर्रिकर यांनी कुठुन लढावे हा त्यांचा विषय आहे पण आम्ही त्यांना दुसरा मतदारसंघ दिला होता पण ते स्वतंत्र लढले. त्यांच्याशी व त्यांच्या कुटुंबाशी आमचे भावनिक नाते आहे. ते विजयी व्हावे अशी आमची ईच्छा होती. त्यांचा पराभव आमच्यासाठी वेदनादायी आहे.

बातम्या आणखी आहेत...