आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्ली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत कॉंग्रेस सुकाणू समितीची बैठक झाली. यावेळी मार्गदर्शन करताना कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कॉंग्रेस नेत्यांना कर्तव्याची आठवण करून दिली आहे. जोपर्यंत ग्राऊंडवर तुम्ही काम करणार नाही, तोपर्यंत संघटनेला यश मिळणार नसल्याचे प्रतिपादन खरगे यांनी केले.
पुढे बोलताना खरगे म्हणाले की, काँग्रेस संघटना मजबूत, उत्तरदायी आणि लोकांच्या अपेक्षांवर खरी ठरलेली आहे. आपण संघटनेसाठी काय करतो. लोकांसाठी कोणते आंदोलन हाती घेतो, याचा विचार केला गेला पाहीजे, आगामी पंधरा ते वीस दिवसात संघटनात्मक कामाची माहिती कॉंग्रेस नेत्यांनी सादर करावी, असे आवाहन खरगे यांनी केले. तेव्हाच आपण येणाऱ्या निवडणुका जिंकू, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस सुकाणू समितीची बैठकीत सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मार्गदर्शन केले.
कॉंग्रेस संघटना आणि कर्तव्यावर केले भाष्य
सोनिया गांधी यांचा विशेष सत्कार करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, सोनिया गांधींनी दोन दशकांहून अधिक काळ नेतृत्व केले आहे. अथक परिश्रम आणि काँग्रेसच्या मूलभूत तत्त्वांवर अढळ विश्वास याच्या जोरावर पक्ष आणि देशाला त्यांचे मार्गदर्शन राहीले आहे. यापुढील काळातही आपणा सर्वांना त्यांच्या अपार प्रेमाची आणि मार्गदर्शनाची आशा आहे. देशासमोरील आव्हानांवर चर्चा करण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांशी काँग्रेस संघटना आणि आपल्या जबाबदाऱ्यांबद्दल जाणीव करू देणार आहे, असे खरगे म्हणाले.
पक्षसंघटनेवर बोलताना खरगेंच्या भाषणातील काही मुद्दे
प्रभारींना विचारले तुम्ही आंदोलनाची ब्लू प्रिंट तयार केली का
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सरचिटणीस आणि प्रभारींना विचारले की, तुम्ही ज्या राज्यात प्रभारी आहात, त्या राज्यात आगामी 30 ते 90 दिवसांत जनहिताच्या प्रश्नांवर संघटना आणि आंदोलनाची रूपरेषा काय आहे? निवडणुकीपर्यंतचे नियोजन आणि आंदोलनाचे वेळापत्रक तयार केले आहे का ? जो पर्यंत तुम्ही महत्त्वांच्या गोषीकडे ब्लू प्रिंट तयार करणार नाही. ग्राऊंड लेव्हलवर त्यांची अंमलबजावणी करणार नाही. तोपर्यंत आपल्याला निवडणुकांत यश मिळणार नाही, याची जाणीव ठेवा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.