आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress To Challenge Supreme Court Order Over Rajiv Gandhi Killers Release Latest News And Update

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या सुटकेला काँग्रेस देणार आव्हान:सर्वोच्च न्यायालयात लवकरच दाखल करणार फेरविचार याचिका

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 6 मारेकऱ्यांच्या सुटकेला काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती काँग्रेसच्या गोटातील सूत्रांनी सोमवारी दिली.

सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच राजीव गांधी हत्याकांडातील मुख्य आरोपी नलिनी श्रीहरणसह 6 जणांच्या सुटकेचे आदेश दिले होते. कोर्टाने तामिळनाडू सरकारच्या शिफारशीनुसार ही कारवाई केली होती. त्यानंतर गत आठवड्यातच या आरोपींची तुरुंगातून सुटका झाली होती. आता त्यांच्या सुटकेवर आक्षेप घेतला जात आहे.

या सुटकेनंतर जवळपास 10 दिवसांनी काँग्रेसने राजीव गांधी हत्याकांडातील आरोपींच्या सुटकेविरोधात फेरविचार याचिका दाखल करण्याचे सूतोवाच केले आहे. काँग्रेसने या आरोपींची सुटका दुर्दैवी व अस्वीकारार्ह असल्याचे म्हटले आहे.

21 मे 1991 रोजी श्रीपेरंबुदुर येथील सभेमध्ये मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वीचा राजीव गांधी यांचा फोटो.
21 मे 1991 रोजी श्रीपेरंबुदुर येथील सभेमध्ये मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वीचा राजीव गांधी यांचा फोटो.

दुसरीकडे, या प्रकरणी केंद्र सरकारनेही सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. केंद्राने यासंबंधी आरोपींच्या सुटकेविरोधात फेरविचार याचिका दाखल केली आहे. या आरोपींची सुटका करण्याअगोदर न्यायालयाने सरकारची बाजू ऐकण्याची गरज होती, असे केंद्राने आपल्या याचिकेत म्हटले आहे.

21 मे 1991 रोजी राजीव यांच्या हत्येपूर्वी घेतलेल्या या छायाचित्रात, पुष्पहार हातात घेऊन LTTE ची मानवी बॉम्ब धनू, काँग्रेसची स्वयंसेविका लता कन्नन आणि तिची मुलगी कोकिला दिसत आहे. पांढरा कुर्ता परिधान केलेल्या व्यक्तीचे नाव शिवरासन असून तो या कटाचे नेतृत्व करत होता. बॉम्बस्फोटात मारला गेलेला एलटीटीईचा छायाचित्रकार हरिबाबू याने हे छायाचित्र काढले आहे.

दुसरीकडे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 4 आरोपींची मृत्युदंडाची शिक्षा कमी करण्याच्या मागणीचे समर्थन केले होते. प्रियंका गांधी वढेरा यांनीही या प्रकरणी तुरुंगात जाऊन एका आरोपीची भेट घेतली होती. तसेच त्यांना क्षमादान दिले होते. पण पक्ष नेतृत्वाने गांधी कुटुंबीयांच्या भूमिकेशी असहमती दर्शवत या प्रकरणी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

राजीव गांधी यांच्यावर त्यांचे पुत्र राहुल गांधी यांच्या हस्ते अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हा राहुल 20 वर्षांचे होते.
राजीव गांधी यांच्यावर त्यांचे पुत्र राहुल गांधी यांच्या हस्ते अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हा राहुल 20 वर्षांचे होते.
बातम्या आणखी आहेत...