आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

काँग्रेस कलह:पत्र लिहिणारे नेते आपल्या मागणीवर ठाम, पण भाषा नरमली; पत्राचा उद्देश पक्षाला मजबूत करणे हाच, आव्हान देणे नव्हे : काँग्रेस नेते

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीही पक्षाध्यक्ष होऊ शकते : अहमद पटेल

लेटरबॉम्ब टाकणारे काँग्रेस नेते आजही आपल्या मागणीवर कायम आहेत. तथापि, त्यांची भाषा नरमली आहे. पत्र लिहिणाऱ्यांपैकी एक कार्यकारिणीचे सदस्य आनंद शर्मा म्हणाले, आमूलाग्र बदलांची आमची मागणी देश आणि पक्षहितासाठीच आहे. काँग्रेसला मजबूत करून भाजपला टक्कर देण्याची इच्छा आहे. दुसरीकडे, वीरप्पा मोईली म्हणाले, सोनियांच्या भावना दुखावल्या असतील तर आम्हाला त्याचा खेद वाटतो. पक्षात नवी ऊर्जा आणण्यासाठी बदल गरजेचे आहेत. पत्र लीक करणाऱ्यांची नावे समोर येण्यासाठी अंतर्गत चौकशी व्हावी.

नेते विवेक तनखा म्हणाले, ते पत्र नेतृत्वाला आव्हान देण्यासाठी नव्हे तर पक्षाला मजबूत करण्याच्या कामाची सुरुवात होती. आधीच्या वृत्तांत म्हटले होते की ७ तास चाललेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत सोनियांना पुन्हा हंगामी अध्यक्ष म्हणून निवडले, पण पत्रातील मुद्द्यांवर चर्चाच केली नाही. त्याउलट गांधी परिवारातील निष्ठावंतांनी असंतुष्टांनाच घेरण्याचा प्रयत्न केला.

संकेत | गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीही पक्षाध्यक्ष होऊ शकते : अहमद पटेल

गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय अहमद पटेल म्हणाले की, एखादा बिगर गांधीही काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष निवडला जाऊ शकतो. कोरोनाची स्थिती सुधारल्यानंतर पक्षांतर्गत निवडणुका घेण्यात येतील.

सल्ला | सोनिया-राहुल नेत्यांना भेटल्यास निम्म्या समस्या दूर होतील : अनिल शास्त्री

शास्त्री म्हणाले, काँग्रेसचे नेतृत्व गांधी कुटुंबाकडे राहिले नाही तर पक्षाचे अस्तित्व संपेल. सोनियांना अध्यक्षपदी राहायचे नसेल तर राहुल वा प्रियंकांकडे धुरा सोपवावी. सोनिया व राहुल यांनी पक्षाच्या नेत्यांना भेटणे सुरू केले तर निम्म्या समस्या दूर होतील.

उग्र | कपिल सिब्बल यांचे ट्वीट : ही पदाची बाब नाही, देशाचा प्रश्न

> कपिल सिब्बल यांनी ट्वीट केले की, हे काेणत्याही पदाबाबत नाही. देशाचा प्रश्न आहे, जो सर्वात जास्त गरजेचा आहे.’

> पी.सी. चाको म्हणाले, “पक्षाचे नेते कार्यकारिणीच्या बैठकीआधी पत्र लिहितात. हे योग्य नाही. कार्यकारिणीचा सदस्य असूनही मला न बोलावणे हे काँग्रेसवर प्रश्न उपस्थित करते.’

> बैठकीनंतर सोमवारी सिब्बल, शशी थरूर यांच्यासह अनेक नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी बैठक घेतली होती. संघटनेत बदल करण्याबाबत सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांमध्ये यांचाही समावेश आहे.

> निलंबित सदस्य संजय झा यांनी ‘हा अंताचा प्रारंभ आहे,’ असा टोला मारला.

पक्षात बदलांसाठी काँग्रेस स्थापन करणार विशेष समिती

पक्षातील बदलांत मदतीसाठी काँग्रेस समिती स्थापन करेल. अहमद पटेल म्हणाले, पत्र लिहिणे पक्षाचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यात योग्य समस्या मांडल्या आहेत, त्यावर विचार व्हायला हवा. पत्रात अनेक गोष्टींत विरोधाभास आहे. एका जागी नेतृत्वाला श्रेष्ठ म्हटले आहे, तर दुसरीकडे सामूहिक नेतृत्वाबाबत सांगितले आहे. काँग्रेस समितीची स्थापना करेल, जी सोनियांना पक्षातील बदलांसाठी मदत करेल.